शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अण्वस्त्रवाहू अग्नी प्राइम आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सोमवारी अग्नी प्रकारातील अत्याधुनिक अग्नी प्राइम या मध्यम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सोमवारी अग्नी प्रकारातील अत्याधुनिक अग्नी प्राइम या मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राची मारकक्षमता १००० ते २००० किमीपर्यंतची असून पाकिस्तान आणि चीनची अनेक महत्त्वाची शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आली आहे. यामुळे भारताने या दोन्ही देशांवर एकप्रकारे सामरिक आघाडी घेतली आहे. ओडिशा राज्यातील बलासोर येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम आयलँडवरून सकाळी १०.५५ मिनिटांनी ही चाचणी करण्यात आली. अग्नी प्राइम हे कॅनिस्टर बेस क्षेपणास्त्र असून ते शत्रूच्या रडार यंत्रणा तसेच उपग्रहांना चकवून ट्रक, रेल्वे यांसारख्या प्रक्षेपक यंत्रणेवरून डागता येऊ शकते.

इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत १०८९ मध्ये भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळख असलेले शास्त्रज्ञ तसेच माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी अग्नी प्रकारातील अण्वस्त्र वाहून नेऊ शकणाऱ्या स्वदेशी आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या कार्यक्रमाला सुरुवात केली होती. त्यानुसार अग्नी प्रकारातील अग्नी १ ते ५ ही क्षेपणास्त्र विकसित करण्यात आली आहे. सध्या ''अग्नी ६'' हे १० हजार किमीपर्यंतची मारकक्षमता असलेले क्षेपणास्त्र विकास प्रक्रियेत आहे.

अग्नी १ हे क्षेपणास्त्र विकसित करून बराच अवधी लोटला होता. यामुळे या क्षेपणास्त्राच्या आधुनिकीकरणाची गरज डीआरडीओ तसेच भारतीय सैन्यदलाने व्यक्त केली होती. त्यानुसार अग्नी प्राइम या नव्या क्षेपणास्त्राच्या विकासाचा कार्यक्रम डीआरडीओने हाती घेतला होता. अग्नी प्राइम हे क्षेपणास्त्र अग्नी १ च्या तुलनेत वजनाने हलके आहे. तसेच हे टू स्टेज सॉलिड फ्युएल क्षेपणास्त्र असण्याने अग्नी १ च्या तुलनेत प्राईम क्षेपणास्त्राचा मारा करण्याचा पल्लाही मोठा आहे.

चाचणीसाठी डीआरडीओने फ्लाय झोन घोषित केला होता. ठरलेल्या वेळेला ही चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राने नेमून दिलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला असून, सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. लवकरच भारतीय सैन्यदलात याचा समावेश केला जाणार आहे.

अग्नी प्रकारातील क्षेपणास्त्र व त्याची मारकक्षमता

अग्नी १ ७०० ते १२०० किमी मारकक्षमता

अग्नी २ २००० ते ३५०० किमी मारकक्षमता

अग्नी ३ ३००० ते ५००० किमी मारकक्षमता

अग्नी ४ ३५०० ते ४००० किमी मारकक्षमता

अग्नी ५ ५००० ते ८००० किमी मारकक्षमता

अग्नी ६ ११००० ते १२००० किमी मारकक्षमता (विकास प्रक्रियेखाली)

क्षेपणास्त्राला लागणाऱ्या प्रणोदकाचे संशोधन होते पुण्यात

अग्नी, पृथ्वी, ब्राम्होस, निर्भया, के ४, नाग, धनुष्य, प्रद्युम्न, पिनाक ही भारताच्या शस्त्रभांडारातील प्रमुख क्षेपणास्त्रे आहेत. यातील अग्नी, पृथ्वी हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहेत, तर ब्रम्होस आणि निर्भया हे गायडेड क्रूझ क्षेपणास्त्र आहेत. कुठल्याही क्षेपणास्त्राला अवकाशात झेपवण्यासाठी खास प्रकारच्या इंधनाची गरज असते. त्याला प्रणोदक असे म्हणतात.

हे प्रणोदक घन आणि द्रव या स्वरूपात असतात. या प्रणोदकाच्या साह्यानेच क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगाने अवकाशात झेपावत असते. या क्षेपणास्त्राला लागणाऱ्या प्रणोदकावर डीआरडीओच्या पुण्यातील उच्च ऊर्जा पदार्थविज्ञान प्रयोगशाळेत (एचईएमआरएल) संशोधन होते. काही दिवसांपूर्वी हे प्रणोदक परदेशातून आयात केले जात होते.

मात्र, भारताने उच्च क्षमतेचे क्षेपणास्त्राला लागणारे प्रणोदक देशातच तयार केले असून, ते सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्रात वापरता येणे शक्य आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेर जाणारा देशाचा निधी वाचणार आहे. या प्रणोदकाचे संशोधन पुण्यातील डीआरडीओच्या या प्रयोगशाळेत झाले आहे.