शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

जिहे कठापूरसाठी ३०० कोटींचा प्रस्ताव सादर करा

By admin | Updated: January 5, 2016 22:41 IST

विजय शिवतारे : कृष्णा खोरे विकास महामंडळाला सूचना

सातारा : ‘जिहे कठापूर उपसा सिंचन योजना कार्यान्वीत करून नेर व अांधळी तलावात पाणी सोडण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यास काही कालावधी लागत असल्याने सुप्रमापेक्षा वाढीव खर्च रक्कम ३०० कोटी खासबाब म्हणून खर्च करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा,’ अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाला (पुणे) दिल्या.जिहे कठापूर उपसा सिंचन योजना कार्यान्वीत करण्याबाबत पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील विधानभवन मधील दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार शशिकांत शिंदे, रणजित देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक रा. ब. घोटे, जलसंपदा विभागाचे मुख्यअभियंता के. एम. शाह, पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, उभारणी मंडळ कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता आ. एन. कोष्टी, जलसंपदा विभागाचे उपसचिव आर. ए. उपासनी, वित्त विभागाचे अवर सचिव एन. व्ही. पाटील, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, जिहे कठापूर उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. गायकवाड आदी उपस्थित होते.नेर उपसा सिंचन योजनेचे वितरण हौद नजीकच्या डोंगरावर उच्च पातळीवर घेऊन बंदीस्त कालवा करून संपूर्ण लाभ क्षेत्र ठिबक सिंचनाद्वारे विकसित करण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण व अंदाजपत्रक सहा महिन्यांत तयार करावे, कोरेगाव तालुक्यातील पूर्व भागातील एकंबे, खिरखिंडी, शेल्टी, रामोशीवाडी इत्यादी गावांना प्रवाही पद्धतीने पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव प्राथमिक सर्वेक्षण करून सहा महिन्यांत सादर करावा, कोरेगाव तालुक्यातील वसना, वांगणा योजनेमधून तलावामध्ये पाणी सोडण्याबाबत प्रस्ताव तीन महिन्यांत सादर करावा, असे निर्णयही यावेळी घेण्यात आले. यावेळी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)