शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रंगला सुबोध भावेच्या गप्पांचा ‘तास’....

By admin | Updated: June 19, 2017 05:17 IST

सोशल मीडिया, मार्कस, लाइक्स व इतरांचे आपल्याबद्दलचे मत यापलीकडे जाऊन स्वत:चा शोध घेण्याची गरज, आपल्याला नक्की काय जमतं, काय केल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सोशल मीडिया, मार्कस, लाइक्स व इतरांचे आपल्याबद्दलचे मत यापलीकडे जाऊन स्वत:चा शोध घेण्याची गरज, आपल्याला नक्की काय जमतं, काय केल्याने आपल्याला आनंद मिळतो त्याचा शोध व पाठपुरावा, तसे केल्याने मिळणारे समाधान...हे तो सांगत होता आणि मुले त्याचे प्रत्येक बोलणं मन लावून ऐकत होती.. तो अभिनय नव्हता तर तो संवाद होता एकमेकांशी..आपला सूर पकडता आला की जीवनाचे गाणे सुरेल होते, अशा शब्दांतून बालगंधर्व फेम सुबोध भावे याने ‘जीवनगाणे’ उलगडले.दहावी-बारावीचे निकाल जाहीर होण्याच्या सुमारास हमखास बातमी येते ती परीक्षेतील अपयशाने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची. याला कारण असतो तो त्याच्यावरील दबाव व एखाद्या जिवापेक्षा मार्कांना दिलेलं अकारण अवास्तव महत्त्व!आपल्या पाल्याला समाधानकारक मार्क मिळत नसतील तर वाटणारी लाज, त्यातून पालक व पाल्यात येणारी उद्विग्नता व या सर्वांना खतपाणी घालणारा पालक आणि पाल्यांमधील विसंवाद व अविश्वास या सर्व बाबींवर अगदी मोकळ्या वातावरणात चर्चा करण्यासाठी सुबोधने पुढाकार घेतला होता. ‘संवाद - गप्पा आणि बरंच काही’ या उपक्रमाचा पहिला भाग नुकताच ज्योत्स्ना भोळे सभागृहात पार पडला.सुबोध भावे फॅन क्लब व वाईड विंग्स मीडिया यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पावसाने जोर लावला असूनही, प्रेक्षकांच्या संख्येवर त्याचा काही परिणाम झाला नाही यातच या विषयाच्या गरजेचे महत्त्व लक्षात येते.सुबोधचा वर्गमित्र व शालेय मुलांमधे विवेकी विचार वर्ग घेणारे डॉ. अमित करकरेदेखील या उपक्रमात सुबोधबरोबर सहभागी झाले आहेत. आपल्या मानसिकतेमधली समाजाकडून मान्यता मिळवण्याची धडपड व त्यासाठी प्रचलित गोष्टींना बळी पडण्याची शक्यता यावर अमित करकरे यांनी मत मांडले. काय करतोय यापेक्षा का करतोय, या प्रश्नाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.