शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टात हजर न राहिल्याने पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलिसांनी गुंड, गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोहीम उघडलेली असून अनेक गुंडांना जेरबंद केले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहर पोलिसांनी गुंड, गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोहीम उघडलेली असून अनेक गुंडांना जेरबंद केले आहे. अशात अटक केलेल्या आरोपींना न्यायालयापुढे हजर करून त्यांची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्याचे काम सध्या सुरु आहे. अशा वेळी कोर्टात हजर न राहिल्याने व त्यामुळे पोलिसांची बाजू व्यवस्थित मांडली न गेल्याने आरोपींना पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी मिळाली. या कसुरीची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला तडकाफडकी निलंबित केले.

गुंड रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारांनी सिंहगड रोड येथे दुकानदारांना धमकावून भर रस्त्यात नाच करुन लोकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रकार नुकताच घडला होता. या प्रकाराची माहिती असतानाही आरोपींना पकडण्याचा अथवा त्या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना न कळविल्याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना नुकतेच निलंबित केले होते. असे असतानाही याच गुन्ह्यातील आरोपीचा तपास उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांच्याकडे दिला होता. यातील आरोपींना ३ मार्च रोजी न्यायालयात घेऊन जाऊन गुन्ह्यातील जप्त रोख रक्कम २ हजार २०० रुपये न्यायालयात जमा करावयाचे आहे.

या आरोपींच्या मदतीने फैजल काझी याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची आहे, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून आरोपींची पोलीस कोठडी वाढून घेण्यात यावी, असे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक व निरीक्षकांनी अविनाश शिंदे यांना दिले होते. त्यांनी आपण कोर्टात जात असल्याचे व्हॉटसअ‍ॅपवर कळविले होते. मात्र, शिंदे हे न्यायालयात हजर राहिले नाहीत. स्वत:ची जबाबदारी त्यांनी सहायक फौजदारांवर टाकली. परिणामी न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्याच दिवशी सायंकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी मोबाईल बंद करुन ठेवला होता. त्यामुळे कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने अविनाश शिंदे यांना अपर पोलीस आयुक्त डॉ़ संजय शिंदे यांनी निलंबित केले आहे.