शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षकपद; प्रतीक्षा यादी लावा

By admin | Updated: October 3, 2015 01:07 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१३ मध्ये ७१४ पोलीस उपनिरीक्षकपदासाठी घेतलेल्या परीक्षेनंतर ६५२ उमेदवार प्रशिक्षणास रुजू झाले; मात्र उर्वरित ६२ रिक्त पदांसाठी आयोगाने अद्यापही प्रतीक्षा यादी लावलेली नाही

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१३ मध्ये ७१४ पोलीस उपनिरीक्षकपदासाठी घेतलेल्या परीक्षेनंतर ६५२ उमेदवार प्रशिक्षणास रुजू झाले; मात्र उर्वरित ६२ रिक्त पदांसाठी आयोगाने अद्यापही प्रतीक्षा यादी लावलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही प्रतीक्षा यादी लावावी, यासाठी २०१३ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. नव्याने ६२ पदे भरण्यासाठी शासनाचा येणारा खर्च व वेळ तर वाचलेच, शिवाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा संपुष्टात येऊ शकणार आहे.दरम्यान, स्पर्धा परीक्षेच्या अध्यादेशानुसार, काही उमेदवार वैयक्तिक व इतर कारणांमुळे नियक्ती स्वीकारत नाहीत. त्यामुळे ती पदे रिक्त राहतात. रिक्त राहिलेल्या पदांसाठी नव्याने निवड प्रक्रिया राबवावी लागते व त्याचा प्रशासनावर आर्थिक व प्रशासकीय ताण पडत असल्याने गुणवत्ता यादीवरील पुढील उमेदवारांची प्रतीक्षा यादी लावली जाऊ शकते. त्याअनुषंगाने ८ आॅगस्ट २०१३ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या बैठकीमध्ये प्रतीक्षा यादी लावणार, असे घोषित केले होते. मात्र अद्यापही ही प्रतिक्षा यादी लावली नसल्याने यासंबंधी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा यादी लावण्याची मागणी केली आहे. यासंबंधी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिले आहे. (प्रतिनिधी)पोलीस उपनिरीक्षकपदासाठी २०१३ च्या परीक्षेनंतर मार्च २०१५ मध्ये त्याचा निकाल लागला. यासाठी विद्यार्थ्यांचे अडीच वर्ष गेले आहेत. दरम्यान, इतर परीक्षांचाही अभ्यास करता आले नाही. काही जण वयोमर्यादेच्या काठावर आहेत. त्यामुळे गुणवत्ता असूनही केवळ प्रतीक्षा यादी नसल्याने अधिकच अडचण झाली आहे. विद्यार्थ्यांचेही वय व वेळ वाचू शकेल, त्यामुळे तातडीने प्रतीक्षा यादी लावावी.- सुजित गुंजाळ, स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी