शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांकडूनच स्टंटबाजी

By admin | Updated: April 25, 2016 01:00 IST

सध्या मंदिरप्रवेशावरुन चालू असलेल्या वादावर अनेक उलटसुलट चर्चा चालू आहेत.

पुणे : सध्या मंदिरप्रवेशावरुन चालू असलेल्या वादावर अनेक उलटसुलट चर्चा चालू आहेत. यामध्ये तृप्ती देसाई, गुप्ते यांसारख्या महिला स्टंटबाजी करत असल्याचे बोलले जात असताना कोणतीही ठोस भूमिका न घेतलेले मुख्यमंत्री खरी स्टंटबाजी करत आहेत. असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केला. बलराज सहानी व साहीर लुधियानवी फाऊंडेशनच्या वतीने रविवारी पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात पुरस्कार सोहळ््याप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी अभिनेता ओंकार गोवर्धन याला बलराज सहानी पुरस्काराने तर लेखक संजय पवार यांना कैफी आझमी पुरस्काराने बाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर फाऊंडेशनचे सचिव सुरेश टीळेकर, दिग्दर्शक धमर्कीर्ती सुमंत, अलका देशपांडे व अनिकेत बाळ उपस्थित होते. बाळ म्हणाल्या, ‘‘महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत शासन आणि मुख्यमंत्री कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत ही खेदाची बाब आहे. तर या अधिकारासाठी लढणाऱ्या महिलांना अशाप्रकारे मार खावा लागतो ही वाईट गोष्ट आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशाचा कायदा ५६ सालीच झालेला असून त्यासाठी भांडण्याची आवश्यकता नसून या कायद्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.’’ बाईच्या पाळीचा शास्त्रीय आधार अपवित्र मानला जात असेल तर त्यामध्ये काही तथ्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या प्रत्येकाच्या तोंडाला कुलूपे लावली जात असून दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि कन्हैया ही त्याची उदाहरणे आहेत. फुले, शाहू आणि आंबेडकरांची नावे घेऊन मोठमोठ्या बाता केल्या जातात, मात्र कोणत्याही गोष्टीचा प्रत्यक्ष अवलंब होताना दिसत नाही. कलाकारांना स्वत:ची स्वतंत्र विचारसरणी असणे आणि आपले विचार उघडपणे मान्य करणे यात काहीही गैर नसल्याचे सांगत पवार यांनी मनोगतात म्हटले. आपल्या व्यवस्थेत कोणत्याही गोष्टीचा विचार हा खोलवर केला जात नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आव्हानांना सामोरे जाण्यात आपण अनेकदा कमी पडलो असलो तरीही आता सक्रीय होण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले. ओंकार गोवर्धन याने आपला नाट्यक्षेत्रातील प्रवास सांगत असताना कोणत्या ना कोणत्या चळवळीशी जोडले जाणे गरजेचे असल्याचेही सांगितले. यावेळी धर्मकीर्ती सुमंत यांनीही ओंकार गोवर्धन याच्याविषयी मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. या वेळी अलका देशपांडे व अनिकेत बाळ यांचाही सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)