शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक धोरणासाठी अभ्यास गट

By admin | Updated: May 8, 2017 03:11 IST

राज्य शासनाच्या वतीने राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांसाठी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासनाच्या वतीने राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांसाठी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती तसेच पायाभूत सुविधांसाठी अनुदान यांसह विविध योजना राबविल्या जातात. मात्र, अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक असल्याने एक अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे.अल्पसंख्याक शाळा/ संस्थांबाबत सर्वोच्च न्यायालयाने चार आदेश दिले आहे. तसेच अल्पसंख्याक शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासंदर्भात प्रशासकीय व शैक्षणिक धोरण तयार करणे आवश्यक आहे. सध्या अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण अस्तित्वात नाही. परिणामी, प्रशासकीय स्तरावर संभ्रमावस्था आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी कायदा व धोरण तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागातर्फे अभ्यास गट स्थापन करण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. या अभ्यास गटाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी सध्या सुरू असलेल्या किंवा सुरू करावयाच्या शासकीय योजनांबाबत विचारविनिमय, तसेच सखोल अभ्यास केला जाणार आहे. शालेय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाने सर्व बाबींचा विचार करून येत्या दोन महिन्यांत शिफारशी शासनास सादर कराव्यात, असे अध्यादेशात नमूद केले आहे.