शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची हजेरी नियमितपणे तपासणार

By admin | Updated: May 7, 2017 03:30 IST

खासगी क्लासेसशी करार करून विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थितीत सवलत दिली जात असल्याच्या प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : खासगी क्लासेसशी करार करून विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थितीत सवलत दिली जात असल्याच्या प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नियमितपणे तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करून हजेरीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत यांनी दिली.जेईई किंवा इतर प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. या परीक्षा तसेच अकरावी व बारावीची संपूर्ण तयारी या क्लासेसमध्ये करून घेतली जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वर्गात बसण्यासाठी सवलत मिळावी, यादृष्टीने काही खासगी क्लासेसने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील काही महाविद्यालयांशी करार केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना केवळ दोन दिवस महाविद्यालयात यावे लागणार आहे. इतर दिवशी उपस्थिती नसली तरीही चालणार आहे. त्याबदल्यात विद्यार्थ्यांकडून महाविद्यालये हजारो रुपये घेत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे. याबाबतचे ‘शिक्षण विभागाला ठेंगा दाखवत गैरहजेरीसाठी सशुल्क सवलत’ हे वृत्त शनिवारी प्रसिद्ध झाले आहे. या प्रकाराची दखल शिक्षण विभागानेही घेतली आहे.याविषयी बोलताना राऊत म्हणाल्या, ‘‘येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. त्यासाठी स्वतंत्र पथके करून महाविद्यालयांना भेटी दिल्या जातील. महाविद्यालयांमध्ये अचानक जाऊन तपासणी केली जाईल. या तपासणीमध्ये सातत्य राखले जाईल. नियमानुसार वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती असलीच पाहिजे. तसेच ज्या महाविद्यालयांना बायोमेट्रिक हजेरीसाठी यंत्रणा बसविणे शक्य आहे, त्यांनी अशी यंत्रणा बसविणे अपेक्षित आहे. त्याचीही माहिती घेतली जाणार आहे.अनुपस्थिती आढळून आल्यास तक्रार करा...वर्गामध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आढळून  आल्यास किंवा एखाद्या महाविद्यालयामध्ये  अकरावी-बारावीचे वर्ग भरत नसल्यास त्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे कुणालाही तक्रार करता येईल.  राज्य शासनाने प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तक्रार पेटी बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या तक्रार पेटीतही याबाबतची तक्रार टाकता येईल, असे आवाहन सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत यांनी केले. प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन संबंंधित महाविद्यालयाची अचानक तपासणी केली जाईल. या तपासणीत विद्यार्थ्यांची सातत्याने अनुपस्थिती आढळून आल्यास संबंधित महाविद्यालयावर कारवाई केली जाईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.