शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी वाहतुकीसाठी सवलतीत मिळणार बस

By admin | Updated: July 24, 2015 04:07 IST

शाळांच्या मागणीनुसार विद्यार्थी वाहतुकीसाठी कराराने देण्यात येणाऱ्या बसच्या दरात २५ टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे : शाळांच्या मागणीनुसार विद्यार्थी वाहतुकीसाठी कराराने देण्यात येणाऱ्या बसच्या दरात २५ टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बैठकीत घेण्यात आला. तसेच या बस उपलब्ध करण्याचे धोरण एक महिन्याच्या आत निश्चित करावे, असे निर्देशही पीएमपी प्रशासनाला देण्यात आले आहेत.पीएमपीकडून शाळांना विद्यार्थी वाहतुकीसाठी कराराने बस उपलब्ध करून दिली जाते. त्याकरिता ६५ रुपये प्रतिकिमी दर आकारला जातो. शालेय विद्यार्थ्यांना बस पासमध्ये ७५ टक्के सवलत देण्यात आली आहे. मात्र, शाळांना विद्यार्थी वाहतुकीसाठी दिलेल्या बसला कोणतीच सवलत दिली जात नव्हती. त्यामुळे करारानुसार बस घेण्यास फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर शाळांना ६५ रुपये प्रतिकिमी दरामध्ये २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली. मागील वर्षी केवळ १८ शाळांनी करारानुसार बस पीएमीपीकडून भाड्याने घेतल्या होत्या. कराराच्या दरात २५ टक्के सवलत देण्यात आल्यामुळे शाळांकडून प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे. शाळा कराराने बस घेण्याकरिता अर्ज करीत होत्या. मात्र, विद्यार्थी वाहतुकीची जबाबदारी घेण्यास त्यांच्याकडून नकार दिला जात होता. यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अनेक निकषांचे पालन करावे लागते, त्याची जबाबदारी शाळांनी घेणे आवश्यक आहे. त्याबाबतही बैठकीमध्ये चर्चा झाली. करारानुसार बस भाड्याने घेणाऱ्या शाळांनी वाहतुकीची जबाबदारी घेणे अपेक्षित आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले.