शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केली हजारो लिटर पाण्याची बचत

By admin | Updated: April 2, 2016 03:33 IST

पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे शाळेला दररोज टॅँकरने हजार लिटर पाणी मागवावे लागत होते. याला फाटा देत शाळेने मुलांच्या वॉटरबॅगमधील वाया जाणारे पाणी एका टाकीत साठवले

निगडी : पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे शाळेला दररोज टॅँकरने हजार लिटर पाणी मागवावे लागत होते. याला फाटा देत शाळेने मुलांच्या वॉटरबॅगमधील वाया जाणारे पाणी एका टाकीत साठवले. एका वर्षात शाळेने तब्बल एक लाख लिटर पाणी साठवून त्याचा वापर शाळेतील झाडे, स्वच्छतागृहे व साफसफाईसाठी केला जात आहे. निगडीतील सिटी प्राइड स्कूल पाणीबचतीचा हा अभिनव उपक्रम गेली दोन वर्षे उपक्रम राबवीत आहे. दररोज मुलांच्या बॉटलमधील शिल्लक राहिलेले पाणी मुले घरी जाताना शाळा सुटल्यानंतर एका बादलीत जमा करतात. मुलांच्या उंचीएवढी बादली मुलांच्या समोर ठेवली जाते. बादली भरल्यानंतर ते पाणी टाकीत टाकले जाते. हा उपक्रम दररोज राबविला जातो.पाणीबचतीमुळे पूर्ण शाळेला सध्या पाणीपुरवठा होत आहे. यापूर्वी मुलांना वापरण्यासाठी लागणारे पाणी टॅँकरने येत होते, तेदेखील बंद झाले. शाळेच्या स्वच्छतागृहांना देखील हेच पाणी वापरले जाते. शाळेच्या आवारातील झाडांना साचलेल्या पाण्यातून पुरवठा केला जातोे. गतवर्षी शाळेने या माध्यमातून एक लाख लिटर पाणी बचत केले आहे. शाळेची विद्यार्थिसंख्या १६५० आहे. बहुतेक विद्यार्थ्याच्या बाटलीत रोज सुमारे २०० एमएल पाणी शिल्लक राहते. यासाठी शाळेत प्रत्येक ठिकाणी पाणी बचतीसाठीचे फलक लावले आहेत. मुलांमध्ये वेळोवेळी पाणी बचतीसाठी जनजागृती केली आहे. शाळेतील नळांच्या टॅबमधून होणारी पाणीगळती शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर त्वरित नळांची दुरुस्ती करुन घेतली. त्यातूनही शाळेने पाणी बचत केले. (वार्ताहर)दररोज जवळपास पाचशे लिटर पाणी बचत होते. असा उपक्रम वर्षभर राबविला जातो. पाणी गळतीसाठी वेळेतच देखभाल दुरुस्तीची कामे होणे आवश्यक आहेत. सर्व नागरिकांनी यासाठी सतर्क व्हावे. देश-विदेशांतून आज या छोट्याशा उपक्रमाचे कौतुक होत आहे. शाळेने मुलांच्या मनात पहिल्यापासूनच पाणी बचत कशी करावी, हे रूजवल्याने मुलांना अवघड जात नाही. - माया सावंत, मुख्याध्यापिका, सिटी प्राइड स्कूल