शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

बसचालकाच्या मुजोरपणामुळे विद्यार्थ्यांची त्रेधा

By admin | Updated: March 24, 2017 03:56 IST

दहावीची परीक्षा सुरू असताना बारामती एसटी आगाराने मात्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी असहकार पुकारल्याचे दिसत आहे.

सोमेश्वरनगर : दहावीची परीक्षा सुरू असताना बारामती एसटी आगाराने मात्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी असहकार पुकारल्याचे दिसत आहे. काही मुजोर बसचालक विद्यार्थ्यांनी हात दाखवूनदेखील बस थांबवत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत संबंधित चालकाची परिवहनमंत्री व विभाग नियंत्रक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.दि. ५ मार्च रोजी एसएससीचा हिंदी या विषयाचा पेपर होता. नीरा-बारामती मार्गावर पणदरेलगत खामगळवाडी या थांब्यावर सायली खामगळ ही दहावीची परीक्षार्थी विद्यार्थिनी उभी होती. तिने एसटी बसला हात दाखवून बस थांबवण्याची विनंती केली. मात्र राजेंद्र होळकर नामक मुजोर चालकाने बस थांबवली नाही. बसमधील प्रवासी हेमंत गडकरी यांनी वाहक शेख यांना आज दहावीचा पेपर आहे. चालकांना बस थांबवण्यास सांगा अशी विनंती केली. मात्र त्यांनीही बस थांबवली नाही. बस बारामती आगारात येताच गडकरी यांनी वाहक होळकर यांना बस न थांबवण्याबाबत विचारणा करताच होळकर यांनी गडकरी यांनाच दमदाटी करत शिवीगाळ केली व मारहाणीची धमकी दिली. गडकरी व परीक्षार्थी मुलीचे पालक विठ्ठल खामगळ यांनी याबाबत परिवहनमंत्री दिवाकर रावते, विभाग नियंत्रक व आगार व्यवस्थापक सुभाष धुमाळ यांच्याकडे तक्रार केली असून, चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खोडद : हिवरेतर्फे नारायणगाव येथे बुधवारी सकाळी ९ वाजता एसटी बस न थांबल्यामुळे नारायणगाव येथे परीक्षेला जाणाऱ्या १०वीच्या आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने व्यवस्था करून नारायणगाव येथे परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर दिला. इयत्ता दहावीची परीक्षा सध्या सुरु आहे. हिवरेतर्फे नारायणगाव येथील ४२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्यांचे नारायणगाव हे परीक्षा केंद्र आहे. एसटी बसने विद्यार्थी नारायणगावला जातात. पहिला पेपर १०:३० वाजता सुरु होतो. बस खोडदहून हिवरेतर्फे नारायणगाव येथे ९ वाजता येते. १० वीच्या परीक्षेसाठी जाणारे सर्व विद्यार्थी या बसने ९:१५ वाजता नारायणगाव येथे पोहोचतात आणि परीक्षा केंद्रावर जातात. रांजणी, वळती, मांजरवाडी, खोडद, हिवरेतर्फे नारायणगाव, साळवाडी, नगदवाडी, ओझर, आर्वी, गुंजाळवाडी या परिसरातून हे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना एसटी बसने प्रवास करून नारायणगाव येथे यावे लागते. हिवरे तर्फे नारायणगाव येथील भोरमळा येथेही काही दिवसांपासून ही एसटी बस थांबत नसल्याने येथील विद्यार्थ्यांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण शिंदे, खजिनदार रामदास शिंदे, संचालक अभिषेक खैरे, उपसरपंच सुधीर खोकराळे, राजेश भोर यांनी याबाबत नारायणगाव एसटी आगारप्रमुख टाकळकर यांना निवेदन दिले.