शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईनपेक्षा शाळेलाच विद्यार्थ्यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST

पुणे जिल्ह्यात (ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व खासगी शाळा) तेरा तालुक्‍यांमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीचे वर्ग असलेल्या ...

पुणे जिल्ह्यात (ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व खासगी शाळा) तेरा तालुक्‍यांमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीचे वर्ग असलेल्या एकूण १ हजार ९५४ शाळा आहेत. त्यामध्ये २ लाख ५३ हजार २१३ विद्यार्थी संख्या आहे. बुधवारपासून (दि. २७) जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी पन्नास टक्के शाळा सुरू झाल्या होत्या. तर ६६ हजार १८ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी १ हजार ९५४ शाळांपैकी १ हजार ८६६ शाळा सुरू झाल्या. त्यामध्ये एकूण २ लाख ५३ हजार २१३ विद्यार्थ्यांपैकी ७६ हजार २५१ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. आज जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांची संख्या वाढली, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण विभागाचे सभापती रणजित शिवतरे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली.

चौकट

...आज आणखीन १६ शिक्षक तर ४ शिक्षकेत्तर कर्मचारी करोना पॉझिटिव्ह

ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ८ वीच्य वर्गांना शिकविणाऱ्या जिल्हा परिषद आणि खासगी शाळेतील एकूण शिक्षक संख्या १० हजार ८६ तर शिक्षकेतर कर्मचारी संख्या ३हजार 91 इतकी आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची करोना नमुने तपासाणी करण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत 8 हजार 445 शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये बुधवारी 12 तर आज दिवसभरात आणखीन 16 असे एकूण 28 शिक्षकांचा अहवाल पॉझीटीव्ह आला. आंबेगाव तालुक्‍यातील 8, दौंड 6, खेड, शिरूर आणि वेल्हा तालुक्‍यातील प्रत्येकी 3, मुळशी 2 तर मावळ, हवेली आणि पुरंदरमधील प्रत्येकी 1 शिक्षकाचा समावेश आहे. 2 हजार 552 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी दौंड तालुक्‍यातील 3, शिरूर तालुक्‍यातील 2 तर मुळशीमधील एक असे एकूण 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

5 वी ते 8 वीच्या शाळा सुरू अहवाल (ग्रामीणमधील जिल्हा परिषद आणि खासगी शळा)

तालुका शाळांची संख्या विद्यार्थी संख्या आज सुरू झालेल्या शाळा आज उपस्थित झालेले विद्यार्थी

आंबेगाव 99 13588 54 2806

बारामती 139 27813 125 8931

भोर 143 7679 122 4160

दौंड 160 15901 147 9620

हवेली 172 28987 134 5586

इंदापूर 142 28038 112 7850

जुन्नर 185 21702 163 9476

खेड 222 37564 43 2835

मावळ 214 24013 174 6788

मुळशी 126 7453 532 2729

पुरंदर 100 13715 99 7106

शिरूर 163 24543 83 6985

वेल्हा 80 2217 78 1379