शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विद्यार्थ्यांनी जाणून घेतला विद्यापीठाचा वैभवशाली इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:43 IST

अन्न वाहून नेण्यासाठी तीनशे फूट लांबीचा बांधण्यात आलेले भुयार, सात कोटी वर्षांपूर्वीच्या बेसाल्ट खडकाच्या दगडातून बांधलेली इमारत, सोन्याच्या मुलाम्याचे केलेले नक्षीकाम आणि १४९ वर्षांची परंपरा

पुणे : अन्न वाहून नेण्यासाठी तीनशे फूट लांबीचा बांधण्यात आलेले भुयार, सात कोटी वर्षांपूर्वीच्या बेसाल्ट खडकाच्या दगडातून बांधलेली इमारत, सोन्याच्या मुलाम्याचे केलेले नक्षीकाम आणि १४९ वर्षांची परंपरा असा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वैभवशाली इतिहास गुरुवारी विद्यार्थ्यांनी जाणून घेतला. निमित्त होते विद्यापीठातर्फे आयोजित हेरिटेज वॉकचे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आॅक्सर्फ्ड आॅफ द इस्ट म्हटले जाते, मात्र या शैक्षणिक ओळखीबरोबरच विद्यापीठाला मोठा ऐतिहासिक वारसासुद्धा लाभला आहे. विद्यापीठाचा हा इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचावा, त्याचबरोबर सामान्य नागरिकांना विद्यापीठाशी जोडून घेता यावे यासाठी हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरुवात गुरुवारी करण्यात आली.या उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व उलगडून सांगण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत तयार करण्यात आलेल्या संग्रहालयाची सफरही घडविण्यात येणार आहे. सध्या असलेली विद्यापीठाची इमारत ही इंग्रजांच्या गव्हर्नरच्या रहिवासाची इमारत होती. पुण्याचा भाग हा मुंबई प्रांतात त्या काळी येत असे. मुंबईत होणाºया मुसळधार पावसामुळे इंग्रज गव्हर्नर पुण्यात राहण्यास येत असत. त्या काळात भारताचा कारभार इंग्रज या इमारतीतून करत . १८६४मध्ये या इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली आणि १८७१ रोजी ही इमारत बांधून पूर्ण करण्यात आली. या इमारतीच्या बांधकामासाठी १ लाख ७५ हजार पौंड (१७ ते १८ लाख) इतका खर्च करण्यात आला. त्या वेळी पुणे इलाख्यातून केवळ ३ लाख रुपये इतका वर्षभरात महसूल गोळा होत असे. त्यामुळे महसुलाच्या ६ पट खर्च या इमारतीच्या बांधकामासाठी करण्यात आल्याने गव्हर्नरला इंग्लंडमध्ये विचारणा करण्यात आली होती. तसेच या इमारतीमध्ये ५०० पौंडाचे झुंबर लावण्यात आले होते, त्यासाठीही गव्हर्नरला धारेवर धरण्यात आले होते. या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे, भटारखान्यातून मुख्य इमारतीमध्ये जेवण नेण्यासाठी तब्बल ३०० फुटांचा भुयारी मार्ग इंग्रजांनी तयार केला होता. तो आजही विद्यापीठाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. गव्हर्नरकडे आलेल्या पाहुण्यांना इथले भारतीय गुलाम दिसू नयेत यासाठी या भुयाराची निर्मिती करण्यात आली होती. या भुयारी मार्गामध्ये गरम पाणी व थंड पाणी वाहून नेण्यासाठी दोन वेगवेगळ्या जलवाहिन्याही आहेत. येथे एक खोली असून त्यामध्ये चांदीची भांडी ठेवण्यात येत असत.इमारतीचे बांधकाम हे बेसाल्ट या दगडामध्ये करण्यात आले आहे. मुख्य इमारतीमध्ये सध्या असलेल्या ज्ञानेश्वर हॉलला त्या वेळी बॉलरूम म्हटले जात असे. या हॉलमध्ये मलेशियाच्या कारागिरांकडून नक्षीकाम करण्यात आले असून, त्यावर सोन्याचा वर्ख चढविण्यात आल्याचे सांगितले जाते. संपूर्ण इमारतीमध्ये सागाच्या लाकडाचा वापर करण्यात आला आहे. १९४९ मध्ये ही इमारत पुणे विद्यापीठासाठी देण्यात आली. विद्यापीठाकडून पुणेकरांसाठी या हेरिटेज वॉकचे पुढेही आयोजन करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ