शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’साठी विद्यार्थ्यांच्या उड्या

By admin | Updated: June 24, 2017 06:10 IST

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तुलनेत राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडू लागल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तुलनेत राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडू लागल्या आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत आॅनलाईन नोंदणी सुरू झाल्यानंतर सहा दिवसांतच तब्बल १ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी नोंदणी केली आहे. अभियांत्रिकीसाठी केवळ १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.मागील काही वर्षांपासून अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहतात. तुलनेने ‘आयटीआय’कडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. यंदा राज्यात आयटीआय प्रवेशासाठी शासकीय व खासगी संस्थांमधील प्रवेशक्षमता एकूण १ लाख ३३ हजार एवढी आहे. केंद्रीय पद्धतीने आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया १९ जूनपासून सुरू झाली असून, २ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. मागील सहा दिवसांत १ लाख ६३ हजार ७९१ विद्यार्थ्यांनी अर्जासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ५ हजार १०६ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरला असून, २४ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केला आहे. तर ८ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी पसंती क्रम अर्जही भरला असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी अद्यापही नऊ दिवसांची मुदत आहे. या तुलनेत अभियांत्रिकीचा विचार केल्यास राज्यात यंदा सुमारे १ लाख ४० हजार जागा उपलब्ध असून त्यासाठी सुमारे १ लाख २० हजार अर्ज आले आहेत. याचा अर्थ यंदाही अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयटीआयला अर्ज करणारे काही विद्यार्थी अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.