शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: May 25, 2017 02:44 IST

परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, ज्या महाविद्यालयातून या प्रश्नपत्रिका बाहेर आल्या आहेत, त्यांना विद्यापीठाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ़विद्यापीठाची सध्या अभियांत्रिकी शाखेची परीक्षा सुरू आहे. विद्यापीठाकडून परीक्षेपूर्वी तासभर आधी परीक्षा केंद्रांना ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठविली जाते. त्यानंतर त्याची प्रिंट घेऊन विद्यार्थ्यांना त्याचे वाटप होते. मात्र, प्रश्नपत्रिकेची प्रिंट आऊट घेतल्यानंतर त्याचे मोबाईलवर फोटो काढून ते व्हॉट्सअ‍ॅप द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यापूर्वीही अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचे प्रकार घडले आहेत. मागील आठवडाभरातही अहमदनगर जिल्ह्यातील व आकुर्डी येथील एका महाविद्यालयातून प्रश्नपत्रिका मोबाईलवर आल्याचे प्रकार समोर आला आहे. या दोन महाविद्यालयांमधून प्रश्नपत्रिकांचे फोटो काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्या. पुणे शहरातील व वाघोली येथील परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर मेकॅनिक्स व गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका आढळून आल्या आहेत. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या महाविद्यालयांतून प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत, त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून योग्य तो खुलासा न आल्यास या महाविद्यालयांची परीक्षा केंद्रांची मान्यता काढून घेण्यात येईल. अशी कारवाई झाल्याशिवाय पेपरफुटीचे प्रकार थांबणार नाहीत, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.‘नीट’ परीक्षेप्रमाणे बंधने : कुलगुरूपेपरफुटी रोखण्यासाठी तासभर आधी प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे केंद्रांवर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यावर विद्यापीठाचे वॉटर मार्किंग, सेंटर कोड, महाविद्यालयाचे नावही दिले जाते. तरीही असे प्रकार होत आहेत. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकेची प्रिंट काढून कोणी तरी त्याचे मोबाईलवर फोटो काढून विद्यार्थ्यांना देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता हे प्रकार रोखण्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू आहे. ‘नीट’ परीक्षेसाठी काही बंधने घालण्यात आली होती. या परीक्षेप्रमाणे काही बंधने घालण्याचाही विचार केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ३० किंवा ४५ मिनिटे आधी येण्याचे बंधन घालून त्या वेळेतच प्रश्नपत्रिका ई-मेल करण्याबाबतही विचार सुरू आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिका पोहोचणार नाहीत. तसेच, या प्रक्रियेचा बाहेरील संस्थेकडून अभ्यास केल्यास त्यातील त्रुटी व आवश्यक सुधारणा करण्याबाबत पर्याय समोर येतील. तसेच, काही कॉलेजमध्ये आॅनलाईन परीक्षाही घेतल्या जातात. अशा विविध पर्यायांवर विचार केला जाईल, असे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले.