शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी अनुभवला अंधश्रद्धा ते विज्ञानाचा प्रवास

By admin | Updated: July 3, 2015 00:30 IST

तारांगणाची सफर करताना आपले विश्व हरपून आनंदाने बेभान झालेली शाळकरी मुले, अंगावर येणाऱ्या ग्रह-ताऱ्यांची दुनिया पाहून उत्कंठा वाढविणारे वातावरण

पिंपरी : तारांगणाची सफर करताना आपले विश्व हरपून आनंदाने बेभान झालेली शाळकरी मुले, अंगावर येणाऱ्या ग्रह-ताऱ्यांची दुनिया पाहून उत्कंठा वाढविणारे वातावरण, त्यातच विज्ञानातील एकेक कोडे अलगद सुटू लागल्याने अंधश्रद्धेच्या दुनियेपासून विज्ञानवादाकडे सुरू असणारा प्रवास गुरुवारी पिंपरी येथे पाहावयास मिळाला. निमित्त होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित विज्ञानबोध वाहिनी या उपक्रमाचे. त्रिवेणी ट्रस्ट, अलाहाबाद यांच्या सहकार्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव रुजविण्यासाठी राज्यभरात विज्ञानबोध वाहिनी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅँटिबायोटिक्स प्रशालेमध्ये गुरुवारी झाली. सुरुवातीला पुणे येथील ओंकारेश्वर मंदिराजवळील पुलावरून फेरी काढली. या वेळी आयसर संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुनील मुखी, वैज्ञानिक डॉ. अतिष दाभोळकर, हमीद दाभोळकर, उच्च शिक्षण विभाग, पुणेचे संचालक धनराज माने आदी उपस्थित होते. येथून पिंपरी येथील एच. ए. स्कूलमध्ये विज्ञानबोध वाहिनीचे उद्घाटन झाले. दरम्यान, भास्कर सदागळे व प्रशांत पोतदार यांनी सादर केलेल्या ‘हसत खेळत विज्ञान’ या कार्यक्रमातून गमतीजमती व किस्से सांगून विज्ञानातील वास्तव विद्यार्थ्यांपुढे उलगडले.शाळेमध्ये विज्ञानवादावर आधारित असा व्यापक कार्यक्रम प्रथमच होत असल्याने याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली. त्यामध्ये थ्रीडी तंत्रज्ञानावर आधारित तारांगणाची सफर करताना ग्रह-ताऱ्यांच्या सान्निध्यात बागडण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. एकेका वर्गातील विद्यार्थ्यांना आळीपाळीने हा रोमांचक अनुभव घेता आला. दरम्यान, आनंदाच्या भरात अनेक चिमुरडे एकच जल्लोष करून नाचत होते. कार्यक्रमस्थळी लावलेल्या भित्तीफलकांद्वारे विद्यार्थ्यांना खगोल विश्वासह विज्ञानाची ओळख करून देण्यात आली. येथेच पुस्तक प्रदर्शन झाले. अंनिसचे राज्य कार्यवाह डॉ. नितीन शिंदे, प्रकल्प समन्वयक संजय बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी संयोजन केले. या वेळी एच. ए. प्रशालेचे प्रमुख एकनाथ बुरसे, रूपाली माने, राजू गायकवाड, संजय अहिरे, प्रताप पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी विज्ञानवादाच्या प्रसारासाठी असे उपक्रम हाती घेतले होते. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांच्या पूर्ततेसाठीच आम्ही ही संकल्पना राबविण्याचे ठरविले असून, हा व्यापक स्वरूपाचा उपक्रम हाती घेतला आहे. मजल दरमजल करीत संपूर्ण महाराष्ट्रभर शालेय विद्यार्थ्यांमध्ये निरंतर जनजागृती करणार आहोत. शहरांतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओळख करून देणारे प्रकल्प काही प्रमाणात असतात. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत अद्याप विधानवाद अपेक्षित पोहोचला नाही. परिणामी, ग्रह-ताऱ्यांबद्दलच्या भ्रामक समजुती त्यांच्या मनात भीती करून राहतात. यातूनच ते अंधश्रद्धेच्या आहारी जातात. आपल्या या भविष्याला त्यांच्या आयुष्यभराच्या नुकसानीपासून परावृत्त करण्यासाठी गावोगावी, दुर्गम भागातही ही विज्ञानवाहिनी पोहोचविणार आहे. - डॉ. हमीद दाभोळकर