शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

कालव्यात पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू

By admin | Updated: April 27, 2017 04:48 IST

रावडी व चिखलगावच्या सीमेवर धोमबलकवडी धरणाच्या कालव्यात पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर शुभम वानखेडे (वय १४, रा. मांढरदेवी, ता. वाई) मुलगा

भोर : रावडी व चिखलगावच्या सीमेवर धोमबलकवडी धरणाच्या कालव्यात पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर शुभम वानखेडे (वय १४, रा. मांढरदेवी, ता. वाई) मुलगा वाहत जाऊन मृत्युमुखी पडल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सुमारे ४ किलोमीटर अंतरावर कर्नावड बोगद्याजवळ त्याचा मृतदेह सापडला आहे.सुभाष चिखलगाव येथील त्याचा मामा खंडू गायकवाड यांच्याकडे लग्नानिमित्त आला होता. कालव्याजवळ शुभम व त्याचा भाऊ खेळत असताना तो पाण्यात पडला. कालव्याला पाणी सोडल्यामुळे पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो पाण्याबरोबर वाहत जात असताना त्याच्या भावाने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. शुभम यापूर्वी मामाच्या गावाला चिखलगावला शाळेत शिकण्यासाठी होता. मात्र सध्या तो मांढरदेवी येथे राहत होता.विद्यार्थ्यांसाठी धोकादायक रावडी व चिखलगाव गावाजवळच्या सीमेवर प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्रातील मिळून ४२ मुले शिक्षण घेत आहेत. मात्र अरुंद आणि वळणाचा रस्ता असून एका बाजूला ओढा आणि दुसऱ्या बाजूला कालवा आहे. शाळेपासून अवघ्या ७० फुटांवर व माध्यमिक शाळेपासून ६० फुटांवर कालवा असल्याने लहान मुलांना धोकादायक आहे. यापूर्वीही एक जण पडून मृत्युमुखी पडला आहे. यामुळे संरक्षक भिंत किंवा तारेचे कंपाऊंड करण्याची मागणी रावडीचे उपसरंपच मोहन बांदल यांनी कार्यकारी अभियंता धोमबलकवडी यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप काहीच कार्यवाही झाली नाही. कदाचित भिंत असती तर मुलाचे प्राण वाचले असते, असे मोहन बांदल यांनी सांगितले. (वार्ताहर)