शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तळेगावमध्ये विद्यार्थ्याचा खून

By admin | Updated: September 3, 2016 03:16 IST

तळेगावमधील इंद्रायणी महाविद्यालयाच्या आवारात महाविद्यालय सुरू असताना वाणिज्य शाखेत बारावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या चेतन दत्तात्रय पिंजण (वय १७, रा. पानसरे

वडगाव मावळ : तळेगावमधील इंद्रायणी महाविद्यालयाच्या आवारात महाविद्यालय सुरू असताना वाणिज्य शाखेत बारावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या चेतन दत्तात्रय पिंजण (वय १७, रा. पानसरे वस्ती, कॅडबरी कंपनीसमोर, इंदोरी) या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. घटनेनंतर त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. चेतनचे वडील दत्तात्रय पिंजण (वय ४८) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . चेतन याचे गुरुवारी मित्रांसोबत भांडण झाले होते. त्यातूनच हा हल्ला करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजला त्याच्या बुलेटवरून आला, त्या वेळी त्याच्यावर दोघांनी मागून धारदार शस्त्राने डोक्यावर आणि छातीवर अनेक वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. इंद्रायणी महाविद्यालयात हाणामारीचे किरकोळ प्रकार रोजच घडत असतात. म्हणून महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालय परिसरात चार सुरक्षारक्षक नेमले आहेत.पोलीस अधीक्षक जय जाधव, उफविभागीय अधिकारी विनायक ढाकणे, स्थानिक गुन्हे विभाग पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर करीत आहेत. (वार्ताहर) घटनेनंतर आरोपींना शिवणे गावातून ताब्यात घेण्यात आले. चहाच्या टपरी काढण्याच्या वादातून ही घटना घडली. पोलीस निरीक्षक बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र मिडगे, सतीश हेडगर, शंकर जम, विजय पाटील, दयानंद लिमण, सुनील जावळे या पथकाने आरोपींना अटक केली.