शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी निवडणुकीत पॅनल तयार करण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 06:00 IST

सामाजिक संघटना किंवा व्यक्ती यांसह कोणत्याही राजकीय पक्षाचा, इतर संघटनांचा सहभाग तसेच चिन्ह, बोधचिन्ह आणि छायाचित्राचा वापर करता येणार नाही.

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकांच्या दरम्यान पॅनल तयार करता येणार नाही, सामाजिक संघटना किंवा व्यक्ती यांसह कोणत्याही राजकीय पक्षाचा, इतर संघटनांचा सहभाग तसेच चिन्ह, बोधचिन्ह आणि छायाचित्राचा वापर करता येणार नाही. महाविद्यालयाच्या किंवा विद्यापीठाच्या आवारात मिरवणुका आणि मेळावे घेण्यास परवानगी असणार नाही, असे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी निवडणुका केवळ औपचारिकता म्हणून घेतल्या जात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.नवीन विद्यापीठ कायद्यात अनेक बंधने घातली आहेत.प्रत्येक विद्यार्थ्याला मतदान करता येईल. मात्र विद्यापीठ किंवा महाविद्यालयाच्या आवारात आवारात मिरवणुका व मेळावे घेता येणार नाहीत. निवडणुकीसाठी प्राचार्यांकडून भित्तीपत्रकाचा आकार आणि नमुना ठरविला जाईल. उमेदवारांना चिन्ह, छायाचित्र किंवा प्रतिमा यांचा वापर करता येणार नाही, असेही आचारसंहितेत म्हटले आहे.>खूप वर्षांनंतर महाविद्यालयात खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत. तज्ज्ञ समितीने निवडणुकांसाठी आवश्यक आचारसंहिता तयार केली आहे. काही अडचणी आल्यास शासनाकडे आचारसंहितेमध्ये बदल करण्याची मागणी केली जाईल.- स्वप्नील बेगडे, प्रदेशमंत्री, अभाविप