शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

विद्यार्थी पासचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:52 IST

नुकतीच उन्हाळी सुटी संपून शाळा सुरू झाल्या आहेत. महाविद्यालयातील वर्गदेखील सुरू झाले आहेत.

बारामती : नुकतीच उन्हाळी सुटी संपून शाळा सुरू झाल्या आहेत. महाविद्यालयातील वर्गदेखील सुरू झाले आहेत. त्यामुळे एसटी बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची मासिक पास काढण्यासाठी तोबागर्दी होत आहे. मात्र, बारामती आगारात एसटी प्रशासनाच्या नियोजनाअभावी पास काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या.मंगळवारी (दि. १९) पास काढण्यासाठी आलेले विद्यार्थी, पालकांमध्ये जोरदार भांडणे झाली. नियोजनाअभावी सर्वत्र आरडाओरड, गोंधळाचे वातावरण होते. भांडण झाल्याने काही विद्यार्थिनींना अक्षरश: रडू कोसळले. मात्र, यावेळी एसटी बसस्थानकात असलेल्या पोलिसांकडे या विद्यार्थिनींनी धाव घेतली. हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी धाव घेत संबंधितांना समज दिली. त्यानंतर येथील गोंधळ थांबला.एसटीची भाडेवाढ झाली आहे. एसटीच्या तिकिटासह पासाचे दरदेखील १८ टक्के वाढले आहेत. त्यामुळे वाढलेल्या पासच्या दराबाबत अनेक विद्यार्थी गोंधळलेले होते, तर काही विद्यार्थ्यांनी पास काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार केली. यावेळी उपस्थित पालक, विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना याबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी सुरक्षारक्षक, रांगा लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, पंख्याची सोय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र रांगा, पास केंद्रामध्ये आणखी खिडक्यांची सुविधा द्यावी आदी मागण्या पालकांसह विद्यार्थ्यांनी केल्या. गेल्या चार दिवसांपासून एसटी पास मिळविण्यासाठी हेलपाटे मारत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.पालक ज्ञानेश्वर साखरे यांनी सांगितले, की सकाळपासून मुलांचे पास काढण्यासाठी रांगेत थांबलो आहे. कर्मचारी उर्मटपणे उत्तर देत आहेत. १२ वाजता अर्ज संपले आहेत, दुपारी २ वाजता या असे सांगत आहेत. अर्जाचे नियोजन करणे आवश्यक होते. अर्जाची किंमत ५ रुपये असताना १० रुपये आकारणी केली जात आहे.निखिल भगत या विद्यार्थ्याने सांगितले, की पास काढण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. रविना होळकर या विद्यार्थिनीने पूर्वीप्रमाणेच महाविद्यालयाच्या ठिकाणी पास देण्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली. तनुजा दराडे या विद्यार्थिनीने मुलींसाठी स्वतंत्र रांग असावी, असे मत व्यक्त केले. अजित मोरे या विद्यार्थ्याने पास काढण्यासाठी जलद यंत्रणा उभारावी, त्यामुळे वाद होणार नाहीत, असे मत व्यक्त केले.पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागलेल्या असताना पाठीमागील दाराने पास दिले जात असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. दिवसभर पास मिळविण्यासाठी अनेक विद्यार्थी, पालक अक्षरश: उपाशी उभेहोते. यावेळी ओळखीच्या काही जणांना पास काढण्यासाठी पाठीमागच्या दाराने प्रवेश दिला जात होता. यावर विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली.>सायंकाळी उशिरा घरी जाणे असुरक्षितसोमवारी पास काढण्यासाठी दिवसभर थांबावे लागले. सायंकाळी उशिरा पास मिळाले. पालक उशिरा थांबू शकतात. मात्र, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांना सायंकाळी उशिरा घरी जाणे असुरक्षित आहे, तर काही पालकांना कामावर दांडी मारून, रजा काढून पास काढण्यासाठी थांबावे लागते. पास जलदगतीने मिळण्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे, असे पालक उमा साळुंके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>मदतीसाठी विद्यार्थिनींचे पोलिसांंना साकडेकाही आडदांड पालकांनी दमदाटी केल्यानंतर होळ (ता. बारामती) येथील दोन विद्यार्थिनी घाबरून गेल्या. त्या विद्यार्थिनी रांगेतून बाहेर पडल्या. एसटी बसस्थानकातील पोलीस मदत केंद्रातील उपस्थित पोलीस कर्मचारी गोरख मलगुंडे यांना विद्यार्थिनींनी हा प्रकार सांगितला. पोलीस मलगुंडे यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली. तुम्ही वयाने मोठ्या आहात, या मुली तुमच्या मुलीच्या वयाच्या आहेत. त्यांना समजून समजुतीने घ्या, मोठ्या माणसांनीच असे वागायचे म्हटल्यावर काय होईल, अशा शब्दांत मलगुंडे यांनी संबंधित पालकांना समज दिली. त्यावर अरेरावी करणारी महिला निरुत्तर झाली. विद्यार्थ्यांनी ‘थँक्यू सर’ असे म्हणत पोलिसांचे आभार मानले. पोलीस कर्मचारी मलगुंडे यांनी पास केंद्रावर एसटीचे स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली.>कोणाला सांगायचंय त्याला सांग, चल निघ इथून...विद्यार्थी पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी होती; मात्र या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र होते. दोन खिडक्यांसाठी पाच रांगा झाल्या. उकाड्याने हैराण झाल्याने सर्वच जण घामाघूम झाले होते. त्यातच मुला-मुलींची रांग एकत्रित होती.यावेळी उशिरा आलेल्या काही महिला, पुरुष पालकांनी रांगेत घुसण्याचा प्रयत्न केला. रांगेत घुसताना विरोध करणाºया विद्यार्थिनींना या आडदांड महिला पालकांनी शिवीगाळ केली. कोणाला सांगायचंय त्याला सांग, चल निघ इथून, अशा भाषेत विद्यार्थ्यांना काही आडदांड पालकांनी अरेरावी केली. यावेळी काही वयोवृद्ध महिलांनादेखील दमबाजी करण्यात आली.>महाविद्यालयात पास केंद्र पुन्हा सुरू कराबारामती एसटी आगाराच्यावतीने यापूर्वी महाविद्यालयाच्या ठिकाणी एसटी पास काढण्याची सुविधा उपलब्ध होती. यामध्ये केंद्रनिहाय तारखा ठरवून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी बारामतीला जाण्याची गरज नव्हती. ठरलेल्या तारखेला महाविद्यालयाच्या ठिकाणीच पास उपलब्ध होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली सोय उपलब्ध होती.शहर, तालुक्यातून पास काढण्यासाठी एकच गर्दी होते. ही सर्व गर्दी एकाच वेळी, एकाच दिवशी आल्यास एसटी प्रशासनावर ताण येतो. येथील पास देणारी यंत्रणा कोलमडून पडते. त्यासाठी पूर्वीप्रमाणेच महाविद्यालयाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पास देण्याची सोय करावी. त्यामुळे अशा प्रकारचे वाद होणार नाहीतच, शिवाय गडबड गोंधळ उडणार नाही, असे बेलवाडी येथील पालक हेमंत थोरात, पवारवाडी येथील पालक बाळासाहेब शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरम्यान, पास काढण्यासाठी गर्दी झाल्यावर एका दिवसात पास मिळत नाही, अनेकदा पास काढण्यासाठी शाळा, महाविद्यालयाचे तास बुडवावे लागतात. अनेकदा विद्यार्थ्यांना दांडी मारावी लागते, असे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले.