शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी गुणवत्तावाढीचे बजेट प्रशासनाच्या हाती

By admin | Updated: November 24, 2014 00:19 IST

शिक्षण मंडळाच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक योजनांचा समावेश असलेला अर्थसंकल्प (बजेट) मंडळाच्या सदस्यांकडून मांडला जातो.

पुणे : शिक्षण मंडळाच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक योजनांचा समावेश असलेला अर्थसंकल्प (बजेट) मंडळाच्या सदस्यांकडून मांडला जातो. परंतु, शिक्षण मंडळाच्या सदस्यांच्या अधिकारावर गदा आल्याने त्यांना विश्वासात न घेता, महापालिका प्रशासनाकडून पहिल्यांदाच परस्पर बजेटचे काम सुरू केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य यंदा अधिकाऱ्यांच्या हाती आहे. केंद्र शासनाच्या मोफत शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षण मंडळ व समित्या बरखास्त करण्याचे आदेश जुलै २०१३ ला देण्यात आले. मात्र, विधिमंडळाने विद्यमान शिक्षण मंडळ सदस्यांना मुदतपूर्ण करण्याचे विधेयक मंजूर केले. मात्र, मंडळाच्या सदस्यांना मुदत दिली, तरी त्यांना अधिकार देण्याविषयीचा वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संबंधित तब्बल ७० प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. दरम्यान, महापालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात दरवर्षी शिक्षण मंडळाच्या बजेटचा समावेश होता. त्यासाठी शिक्षण मंडळाकडून स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला जातो. स्थायी समिती व मुख्य सभेतून ३१ डिसेंबरपूर्वी बजेट मंजूर करण्याची आवश्यकता असते. शिक्षण मंडळ सदस्यांच्या अधिकाराचा वाद अद्याप मिटलेला नाही. सर्वपक्षीय गटनेत्यापुढे हा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच शिक्षण मंडळ सदस्यांना अर्थसंकल्प तयार करताना विश्वासात घेण्यात आलेले नाही. महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बजेटचे कामकाज सुरू केले आहे. मात्र, एकाही बैठकीला सदस्यांना बोलविण्यात आले नाही. महापालिका व मंडळातील प्रशासनाकडून पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या योजनाचे बजेट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या बजेटविषयी सर्वांना उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)