शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
3
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
4
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
5
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
6
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
7
पैसे तयार ठेवा! टाटा कॅपिटलचा IPO लवकरच! शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व तपशील
8
१५ वर्षीय मुलीच्या मागेच लागला साप; १ महिन्यात ६ वेळा चावला, प्रत्येकवेळी पायावर खुणा सोडल्या
9
दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीची मैदानात एन्ट्री; चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करणारी 'ती' कोण?
10
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
11
"आम्ही भेटायला जाणार होतो पण...", प्रियाच्या निधनाबद्दल समजताच उषा नाडकर्णींना अश्रू अनावर
12
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
13
क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा
14
हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी
15
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
16
Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
17
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता 
18
विरार इमारत दुर्घटनाप्रकरणी आणखी चौघांना अटक; जागा मालकाचाही समावेश
19
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
20
रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा

विद्यार्थ्याने भंगारातून बनवली नवी कोरी दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:41 IST

लहानपणापासून दुचाकीचे वेड... आपले गाडी बनवण्याचे वेड पूर्ण करण्यासाठी निडगी येथून आणलेल्या स्क्रॅब गाडीच्या सांगाड्यावर दिवस-रात्र मेहनत घेत सोमेश्वर येथीळ एका तरुणाने चक्क ३० हजार खर्च करून भंगारातून तब्बल १ लाख ५० हजारांची गाडी बनवली.

सोमेश्वरनगर : लहानपणापासून दुचाकीचे वेड... आपले गाडी बनवण्याचे वेड पूर्ण करण्यासाठी निडगी येथून आणलेल्या स्क्रॅब गाडीच्या सांगाड्यावर दिवस-रात्र मेहनत घेत सोमेश्वर येथीळ एका तरुणाने चक्क ३० हजार खर्च करून भंगारातून तब्बल १ लाख ५० हजारांची गाडी बनवली. रत्नसिंह गाडगे असे या तरुणाचे नाव असून त्याची गाडी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या रत्नसिंहला लहानपणापासूनचदुचाकी गाड्यांचे वेड आहे. आई-वडील दोघे प्राथमिक शिक्षक आहेत. या वेडापायी त्याने सोमेश्वरनगर येथील इंजिनिरिंगच्या मेकॅनिकल शाखेत प्रवेश घेतला. गेल्यावर्षी स्क्रॅप झालेली गाडी त्याने आणली. गाडीची स्थिती बघता सर्वांनीच त्याचा गाडी आणण्याचा निर्णय चुकीचा ठरवला. शेजारी दिलीप सोरटे यांच्या जुन्या दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये नवीन बाईक बनवण्याचे त्याचे काम सुरू झाले. गाडीचे नवीन भाग घेण्यासाठी स्वत:जवळचे साठवलेले पैसे कामी आले. मग हळूहळू एक एक भाग मिळवले. त्याचे मित्र सूरज जाधव व अतुल होळकर यांनी नीरा येथील अस्लम पठाण यांच्याशी संपर्क केला, त्यांनी पार्ट शोधून देण्याची तयारी दाखवली. मुंबई येथून त्यांच्या गॅरेजमध्ये साहित्य त्याने आणले. येथील अविनाश गायकवाड यांनी गाडीचे रंगाचे काम करण्याची तयारी दर्शवली. रत्नसिंहने स्वत: गाडीचे सॉफ्टवेअरचे डिजाईन तयार केले. गाडीच्या लिवरचे डिजाईन शेजारीच स्वप्निल गायकवाडसह त्याने राम आर्टस येथे तयार केले. गाडीचा पुढील हेडलाईट अद्याप मिळालेला नव्हता. तो वडगाव येथील प्रवीण चोरगे व महेश चोरगे या बंधूंनी शोधून दिला. २८ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री उशिरा त्यांच्याशी बोलत असताना फोनवरून त्यांनी फ्यूज पाहून तो जळाला असल्याचे पाहिले. गायकवाड यांनी त्यांच्याकडील वायर दिली आणि त्यादिवशी त्याची दुचाकी जिवंत झाली. अगदी टारझन चित्रपटच आठवला. राहिलेले भाग बसवण्यासाठी येथील प्रवीण सोरटे यांनी होकार दिला. शोरूमचे वर्कशॉप मॅनेजर तांबवे, संदीप वाइकर, जावेद तसेच इतर सर्व स्टाफ ने मदत केली. दि. ३ जानेवारी २०१८ रोजी गाडी नवीन स्थितीत तयार झाली. आठ हजारातून भंगारातून आणलेल्या गाडीला ३० हजार खर्च करून रत्नसिंह ने १ लाख ५० हजाराची गाडी बनविली.