पुणे - सीओईपीमधील इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाच्या असलेल्या विद्यार्थ्यांने कॉलेजच्या मुख्य इमारतीमधील बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आला़ यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळउडाली आहे़नेहल श्रीकृष्ण ठाकरे (वय २१, रा़ सीओईपी हॉस्टेल, शिवाजीनगर, मुळ श्रीगौरी शंकर सोसायटी, कल्याण, ठाणे) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, नेहल ठाकरे हा मुळचा कल्याण राहणारा असून सध्या तो शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तृतीय वर्षात शिकत होता़ कॉलेजचे सुरक्षा रक्षक भगवान कोळी हे पहाटे गस्त घालत असताना त्यांना पहिल्या मजल्यावरील बाथरुममध्ये नायलॉनच्या दोरीने नेहल ठाकरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले़ त्यांनी याची माहिती कॉलेजच्या प्रशासनाला दिली़ त्याची माहिती मिळाल्यावर खडकी पोलीस घटनास्थळी आले़ त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने खाली घेऊन ससून रुग्णालयात नेले़ डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले़नेहल याला इंजिनिअरिंग पेक्षा साहित्यात जास्त रस होता़ त्यातच त्याला करीयर करायचे होते़ तो गुन्हेगारी साहित्य लिहिणे व वाचण्यात रस घेत होता़नेहल ठाकरे याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही़
सीओईपी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:56 IST