शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल दरोडेखोरांना अटक

By admin | Updated: February 1, 2016 00:40 IST

गेली दीड वर्ष जेजुरी व परिसरात दुचाकी वाहने अडवून लूटमारीचे सत्र सुरूहोते. जेजुरी पोलिसांनी विशेष पथक तयार करून, अट्टल तीन दरोडेखोरांना ताब्यात घेऊन त्यांनी केलेले सहा

जेजुरी : गेली दीड वर्ष जेजुरी व परिसरात दुचाकी वाहने अडवून लूटमारीचे सत्र सुरूहोते. जेजुरी पोलिसांनी विशेष पथक तयार करून, अट्टल तीन दरोडेखोरांना ताब्यात घेऊन त्यांनी केलेले सहा गुन्हे उघडकीस आणून या दरोडेखोरांकडून आठ दुचाकी व सुमारे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली.पुरंदर तालुक्यातील माळशिरस, वाघापूर, पारगाव, मावडी, शिवरी, आदी ग्रामीण परिसरात गेल्या एक ते दोन वर्षांपासून निर्जन ठिकाणी रस्त्यावर दुचाकी वाहने अडवून लूटमार करण्याचे सत्र सुरूहोते. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.जयदेव जाधव, अप्पर अधीक्षक तानाजी चिखले, उप अधीक्षक अशोक भरते, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी लूटमारीचे सत्र थांबविण्यासाठी व गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी विशेष पथक तयार केले.स.पो.नी.वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, पो.हवालदार शिवा खोकले, रणजित निगडे, विशाल जावळे, संतोष अर्जुन, अक्षय यादव, सचिन पड्याळ या पथकाने कुविख्यात दरोडेखोर देवानंद संतोष राठोड ( वय २०), पिपलरुशी अविनाश राठोड (वय २०) व भीष्म संतोष राठोड (वय २२) (सर्व जण रा. जेजुरी) यांना जेरबंद केले होते. या दरोडेखोरांनी लूटमार केलेले सहा गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. या दरोडेखोरांकडून आठ दुचाकी व सव्वाचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.दरोडेखोरांनी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आठ दुचाकी चोरल्या असून, या गाड्यांच्या मालकांचा शोध पोलीस घेत आहेत. या दुचाकींची माहिती पुढीलप्रमाणे- निळ्या रंगाची बजाज पल्सर एमएच १२ ईके-७९६५, पांढऱ्या रंगाची हिरो होंडा एमएच १२ केएम २२७५, बजाज प्लॅटीना एमएचक्यू ६४८८, काळ्या रंगाची हिरो होंडा स्पेंल्डर, बजाज पल्सर एमएच १४ ए.जे. ३९१६, आदी दोन गाड्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. ( वार्ताहर)