शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावर उत्सुकता मनात प्रश्नांचे काहूर

By admin | Updated: December 29, 2016 03:10 IST

चेहऱ्यावर उत्सुकता, मनात प्रश्नांचे काहूर अशीच काहीशी अवस्था विज्ञान काँग्रेसमध्ये विविध प्रयोग पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची झाली होती. वेगवेगळे नवनवीन प्रयोग

बारामती : चेहऱ्यावर उत्सुकता, मनात प्रश्नांचे काहूर अशीच काहीशी अवस्था विज्ञान काँग्रेसमध्ये विविध प्रयोग पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची झाली होती. वेगवेगळे नवनवीन प्रयोग पाहताना विचारलेले अनेक प्रश्न तर विमान, तारांगण पाहून हरखून गेलेले विद्यार्थ्यांचे चेहरे यामुळे बारामती येथे भरलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये बुधवारी उत्साहाचे वातावरण होते. २४ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवशी फिल्म शोमध्ये निसर्ग व विज्ञानविषयक विविध माहितीपट दाखविले गेले. तसेच सर्पप्रदर्शनात प्रत्यक्ष साप पाहून त्याची माहिती घेताना मुलांच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त उत्सुकता दिसून आली. सापांबाबत समाजात असलेले विविध गैरसमज दूर करून साप हा माणसाचा कसा मित्र आहे, याची माहिती या वेळी दिली गेली. (प्रतिनिधी)वैमानिक करिअरचेही मार्गदर्शनया प्रदर्शनादरम्यान प्रणव चिट्टे यांनी विमानांच्या साठहून अधिक प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. यात लढाऊ विमानांच्या प्रतिकृती अधिक संख्येने आहेत. यामध्ये जगातील पहिले विमान ज्या राईट बंधूंनी उडविले होते, त्या विमानाचीही प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. याशिवाय हेलिकॉप्टरच्या प्रतिकृती येथे आहेत. विमान व विमानतळ म्हणजे काय याचीही माहिती येथे दिली जात आहे. विद्यार्थी व पालकांसाठी दहावी-बारावीनंतर वैमानिक म्हणून काय करिअरच्या संधी आहेत, याचेही मार्गदर्शन येथे केले जात आहे.भारतीय संस्कृतीचे घडले दर्शनया प्रदर्शनादरम्यान कतारच्या विद्यार्थ्यांनी एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. या सांस्कृतिक उपक्रमात हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली व झारखंडच्या विद्यार्थ्यांनी आपली परंपरागत कला सादर करत भारतातील विविधतेचे दर्शन उपस्थितांना घडविले. नृत्य, लघुनाटिका, गीते, समूह गीतगायन, एकपात्री प्रयोगाद्वारे ही विविधता दिसून आली.