शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

महिन्यानंतर सराफ आंदोलनावर ठाम

By admin | Updated: March 31, 2016 02:56 IST

अबकारी कायद्यातील जाचक अटींविरोधात पुण्यातून सुरू झालेल्या सराफ व्यावसायिकांच्या बेमुदत बंद आंदोलनाला गुरूवारी एक महिना पुर्ण होत आहे. आतापर्यंत सराफांनी केलेल्या

पुणे : अबकारी कायद्यातील जाचक अटींविरोधात पुण्यातून सुरू झालेल्या सराफ व्यावसायिकांच्या बेमुदत बंद आंदोलनाला गुरूवारी एक महिना पुर्ण होत आहे. आतापर्यंत सराफांनी केलेल्या आंदोलनामध्ये हे आंदोलन सर्वाधिक काळ चालणारे ठरले आहे. तरीही लहान-मोठ्या सराफ व्यावसायिकांनी एकजुट दाखवत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. अबकारी कायद्यातील जाचक अटी-नियम रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर सराफ ठाम आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दि. २९ फेब्रुवारी रोजी संसदेत अंदाजपत्रक सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून देशभरातील सराफ संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्याची सुरूवात मात्र पुण्यातून झाली. पुणे सराफ असोसिएशनने तातडीने बैठक घेत दि. १ मार्च रोजी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हे लोण हळू-हळू राज्यभरात पसरले. देशभरातील सराफ संघटनांनी या आंदोलनात उडी घेतली. तेव्हापासून सुरू झालेल्या आंदोलन सलग महिनाभर सुरू आहे. अबकारी कायद्याविरूध्द सराफांनी २०१२ मध्येही आंदोलन पुकारले होते. त्यावेळी हे आंदोलन २१ दिवस चालले. त्यानंतर सध्या सुरू असलेले आंदोलन सर्वाधिक काळ चालणारे ठरले आहे. केंद्र सरकारकडून सराफांच्या मागण्यांबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.त्यामुळे सराफांनी आपले आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनामुळे आतापर्यंत एकट्या पुण्यात महिनाभरात हजारो कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. सराफ असोसिएशनचे सचिव अभय गाडगीळ म्हणाले, केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यावर लावलेला एक टक्का कर भरण्यास सराफ तयार आहेत. मात्र अबकारी कायद्यानुसार अबकारी विभागातील अधिकाऱ्यांना जे अधिकार दिले आहेत, त्याला आमचा विरोध आहे. या अधिकारानुसार संबंधित अधिकारी नाहकपणे दुकानात येवून त्रास देवू शकतील.तसेच अंदाजपत्रकानंतर लगेचच कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. हे चुकीचे असून नुकत्याच स्थापन केलल्या केंद्रीय समितीच्या अहवालानंतर त्यात बदल करून अंमलबजावणी सुरू करायला हवी. सराफांकडे काळा पैसा नाही. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे अशा बुलियनला कायद्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. सराफांवर मात्र करही लावण्यात आला आहे. (प्रतिनिधीआंदोलन सुरू झाल्यापासून पुण्यासह देशभरात मोर्चे, धरणे आंदोलन, रास्ता रोको अशा विविध मार्गाने लढा सुरू ठेवण्यात आला आहे. पुण्यात लाखो सराफांना एकत्रित करून महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने मोर्चा काढला. कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे अशा सर्वच पक्षांनी सराफांना पाठिंबा दिला आहे. सराफ संघटनांनीही भाजपसह विविध पक्षांच्या नेत्यांना निवेदन देवून मागण्या मांडल्या आहेत. देशभरात ठिकठिकाणी तेथील सराफ विविध मार्गाने आंदोलन करीत आहेत.