शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

शहरात पावसाची जोरदार हजेरी

By admin | Updated: November 23, 2015 00:58 IST

शहर व परिसरात रविवारी पावसाने हजेरी लावली. दिवसभरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १ मिमी पाऊस पडल्याची नोंद हवामानशास्त्र विभागाकडे झाली आहे.

पुणे : शहर व परिसरात रविवारी पावसाने हजेरी लावली. दिवसभरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १ मिमी पाऊस पडल्याची नोंद हवामानशास्त्र विभागाकडे झाली आहे. रात्री आठ वाजल्यानंतर शहरात बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शहर व परिसरात शनिवारपासून पाऊस पडत आहे. शनिवारी शहरात काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला होता. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपार एक वाजल्यानंतर शहरातील बहुतांश भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. साधारणत: दोन ते अडीच तास हा पाऊस सुरू होता. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली. पण सात वाजल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने दुचाकी घसरण्याचे प्रकारही घडले. रस्त्यांच्या कडेला सखल भागात पाणी साठले होते. रविवारी सुटीचा दिवस असल्याने फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांचा या पावसामुळे हिरमोड झाला. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहराच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.