शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शाखा अभियंत्याला लाच घेताना अटक

By admin | Updated: February 2, 2016 01:15 IST

खेड पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील शाखा अभियंता अशोक पांडुरंग वानखेडे (वय ५१, रा. पुणे) यांना पर्यावरण संतुलित गावांतर्गत रस्त्याच्या मुरुमीकरणाच्या कामाचे

राजगुरुनगर : खेड पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील शाखा अभियंता अशोक पांडुरंग वानखेडे (वय ५१, रा. पुणे) यांना पर्यावरण संतुलित गावांतर्गत रस्त्याच्या मुरुमीकरणाच्या कामाचे मूल्यांकन करून देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. लाचलुचपत पथकाने दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक (ठाकूर पिंपरी) येथे पर्यावरण संतुलित ग्राम योजनेंतर्गत मुरुमीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचे सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांचे बिल ग्रामपंचायतीकरिता मंजूर करण्यासाठी त्याचे मूल्यांकन करून द्यावयाचे होते. हे मूल्यांकन करून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याकडे खेड पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अशोक वानखेडे हे वीस हजार रुपये लाच मागत होते. पिंपरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीनुसार सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंचायत समितीच्या आवारातील बांधकाम विभागाच्या कार्यालयात लाचलुचपत पथकाने सापळा रचला. त्यात वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शाखा अभियंता अशोक वानखेडे यांना रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरूहोती. लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली.