शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात गुरुवारी बारामती एमआयडीसीत संप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 11:27 IST

कामगारांची सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात

बारामती : कामगार कायद्यात केंद्र सरकारने कामगार विरोधी बदल केले आहेत.केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात गुरुवारी(दि. २६) एमआयडीसीतसंप करण्यात येणार आहे.त्यादिवशी एमआयडीसीत यंत्रांची चाके थांबणार आहेत.

ग्रीव्हज कॉटन अ‍ॅण्ड अलाईड कंपनीज एम्प्लॉइज युनियन चे प्रतिनिधी तानाजी खराडे,सचिन चौधर,अशोक इंगळे,हनुमंत गोलांडे,सुनील शेलार यांनी याबाबत माहिती दिली.त्यानुसार कंपनीतील सर्व कामगार बंधू-भगिनींना नोटीसद्वारे संपाची माहिती देण्यात आली आहे. केंद्रातील भाजपा सरकारने देशात कामगार कायद्यामध्ये कामगार विरोधी बदल केलेले आहेत.त्यामुळे कामगारांची सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे.

कोरोना काळातील शांततेचा फायदा घेऊन संरक्षण, विमा व बँकासारख्या मुलभूत सार्वजनीक क्षेत्रातील उपकम देखील विकून टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. सर्वत्र कंत्राटीकरण सुरू आहे. कोरोना काळात कोटयावधी लोकांचा रोजगार गेलेला आहे. अतिवृष्टी व नापिकीमुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला असताना त्यांना तात्काळ साहय देण्याची गरज  आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांना बड्या जागतिक व्यापारी कंपन्यांच्या दावणीला बांधणारे कायदे देखील केलेले आहेत. सर्व केंद्रीय संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये सर्व संघटीत, असंघटीत, कंत्राटी, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कामगार मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. आयटक सहभागी असलेल्या पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समिती या संपामध्ये सहभागी आहे. तरी २६ नोव्हेंबर २०२० रोजी कोणीही कामावर न येता आपल्या न्याय मागण्यांसाठी या संपामध्ये सहभागी व्हावे. त्याच दिवशी ११ वाजता कामगार संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत,अशी माहिती संघटना पदाधिकाऱ्यांनी दिली.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीStrikeसंपMIDCएमआयडीसी