शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत फेरीवाल्यांवर आता कडक कारवाई, कारवाईचा प्रशासनाचा अभिप्राय मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:30 IST

शहरात दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न अधिक गंभीर होत असून, यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांकडून देखील अनेक तक्रारी येत आहे.

पुणे - शहरात दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न अधिक गंभीर होत असून, यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांकडून देखील अनेक तक्रारी येत आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृत फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणेदेखील शक्य नाही. यामुळे यापुढे शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याचा प्रशासनाचा अभिप्राय स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायमध्ये महापालिकेच्या जुन्या हद्दीत व पेठांमध्ये अ, ब, क वर्गवारीतील व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यास जागा अपुऱ्या पडत असून, त्यामुळे ड व ई वर्गवारीतील व्यावसायिकांचे वाहतुकीचे व स्थानिक नागरिकांच्या येणाºया तक्रारींच्या अनुषंगाने पुनर्वसन करणे शक्य होणार नसल्याने वाहतुकीस होणारा अडथळा विचार घेऊन कारवाई करण्याचा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे.शहरातील २८,२५२ फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यात २१ हजार ३२ फेरीवाल्यांची संगणकीय नोंदणी झाली आहे. २० हजार ६८५ फेरीवाल्यांना त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र देण्यात आलेआहेत.उर्वरीत फेरीवाल्यांनी कागदपत्रे न दिल्यामुळे किंवा व्यवसाय करत नसल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेली नाहीत. पहिल्या टप्प्यात पहिल्या तीन वर्गवारीतील व्यावसायिकांचे पुनर्वसन मान्य झालेल्या ४२० पुनर्वसन हॉकर्स झोनमध्ये करण्यासाठी आणि ड व ई वर्गवारीतील व्यावसायिकांचे जागा शिल्लक राहिल्यास दुसºयास टप्प्यात पुनर्वसन करण्याचे ठरविण्यात आले आहे.सध्या ४२० ठिकाणी पुनर्वसन होणारअनेक बाबींना प्रभाग समिती व शहर फेरीवाला समिती यांची मान्यता घेऊन मुख्य सभेच्या अन्वये उपसूचनांना मान्यता देण्यात आलेल्या महापौरांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीमध्ये (गटनेते व पदाधिकारी) वेळोवेळी मान्यता घेण्यात आली आहे.सद्यस्थितीत शहरातील ६,६६२ फेरीवाल्यांचे ४२० ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. उर्वरीत फेरीवाल्यांच्या पुनर्वसानची कार्यवाही सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या ओटा मार्केटमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची कार्यवाही चालू असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या