शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा जाहिरातदारांवर कडक कारवाई?

By admin | Updated: January 1, 2015 00:55 IST

मालमत्ता विरूपण प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश पीएमपी प्रशासनाने सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहेत.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस, तसेच बसस्थानकांवर बेकायदेशीरपणे जाहिराती लावणाऱ्यांवर मालमत्ता विरूपण प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश पीएमपी प्रशासनाने सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. येत्या १५ जानेवारीपर्यंत प्रत्येक आगाराने किमान १० गुन्हे दाखल करण्याचे उद्दिष्टही देण्यात आले आहे.‘पीएमपी’च्या बस, तसेच बसस्थानकांवर जाहिराती लावण्यासाठी प्रशासनाकडून अधिकृतपणे परवानगी दिली जाते. त्यापासून पीएमपीला मोठे उत्पन्नही मिळते. मात्र, अनेक जण पीएमपी प्रशासनाची परवानगी न घेता बसस्थानके, तसेच बसच्या आत-बाहेर विविध जाहिराती चिटकवत असतात. मालमत्ता विरूपण प्रतिबंध अधिनियमांतर्गत खासगी किंवा शासकीय इमारती, वाहनांवर जाहिराती लावण्यासाठी संबंधितांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी न घेता जाहिरात लावल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र, पीएमपी प्रशासनाने आजवर अशा बेकायदा जाहिरातदारांवर एकदाही या कायद्यांतर्गत कारवाई केलेली नाही. बसवर चिटकविलेल्या जाहिराती पीएमपीचे कर्मचारीच काढून टाकत असत. मात्र, संबंधितांवर कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे परवानगी न घेता जाहिराती लावणाऱ्यांची संख्या वाढतच चालली होती. परिणामी, बसचे विदु्रपीकरण होते.यापुढे पीएमपी प्रशासनाने मालमत्ता विरूपण कायद्यांतर्गत बेकायदा जाहिराती लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे सर्व अधिकार आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. व्यवस्थापकांना आपल्या आगारातील बसवर लागलेल्या जाहिरातींवर कारवाई करण्यासंदर्भात पुढील निर्णय घ्यायचा आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून केली जाणार आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत प्रत्येक आगाराने किमान १० गुन्हे दाखल करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने दिले आहेत, असे पीएमपीतील एका अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)