शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

साकुर्डेकरांचे हात बळकट करणार

By admin | Updated: May 13, 2017 04:21 IST

अभिनेता आमिर खान याच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत साकुर्डे येथील ग्रामस्थ उतरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : अभिनेता आमिर खान याच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत साकुर्डे येथील ग्रामस्थ उतरले आहेत. गेल्या महिनाभरात येथे झालेले काम भविष्यात एक रोल मॉडेल ठरू शकते, एवढे प्रचंड काम उभे राहिले आहे. गाव पाणीदार करण्याची जिद्द बाळगणाऱ्या साकुर्डेकरांचे हात बळकट करण्यासाठी पुढील १५ दिवस जेजुरी औद्योगिक वसाहतीतील लघुद्योजकांची संघटना (जीमा) उतरत असल्याचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे यांनी म्हटले आहे.बुधवारी सकाळी १० वाजता साकुर्डे येथे जेजुरी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, कार्याध्यक्ष रवी जोशी, सचिव रमेश पाटील, पदाधिकारी अनंत देशमुख, राहुल कुंभारे, संतोष सस्ते आदी दोन जेसीबी मशीनसह दाखल झाले. पुरंदर पाणी फाउंडेशनचे समन्वयक सुरेश सस्ते, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती नीलेश जगताप, पुरंदर खरेदी-विक्री संघाचे संचालक संग्राम सस्ते, सरपंच तृप्ती जगताप, सदस्या सविता जगताप, नियोजक पोपट जगताप, शिवराज सस्ते पाणी फाउंडेशनचे रघुनाथ जगताप, आमिर पटेल, लालमुहंमद पठाण, अक्षय बनकर आदींनी त्यांचे स्वागत केले. या वेळी पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी गायत्री तांदळे व श्वेता शिगवण यांनी पुण्याहून बसने येऊन उत्स्फूर्तपणे येथील ग्रामस्थांबरोबर श्रमदानास हजेरी लावली होती. त्यांचेही ग्रामस्थांनी स्वागत व अभिनंदन केले. डॉ. रामदास कुटे यांच्या हस्ते जेसीबी मशीनच्या साह्याने कामाचा आरंभ करण्यात आला. डॉ. कुटे पुढे म्हणाले, की साकुर्डेकरांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही आलो आहोत. स्पर्धेत या गावाला यश मिळेल, अशी खात्री व्यक्त करून त्यांनी झालेले काम पाहता, भविष्यात हे गाव पाणीदार दिसणार आहे.