शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात वादळी पावसाचा जोरदार तडाखा, शहरात ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:42 IST

विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह शहर व उपनगरांना शुक्रवारी वादळी पावसाने झोडपून काढले. वादळी वा-यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याने वाहतूककोंडी झाली.

पुणे : विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह शहर व उपनगरांना शुक्रवारी वादळी पावसाने झोडपून काढले. वादळी वा-यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याने वाहतूककोंडी झाली. काही भागात विजेच्या तारांवर झाड पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील प्रमुख रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले होते. लोहगाव परिसरात तब्बल २६.३ मिलीमीटर पाऊस पडला. शहरात रात्री साडेआठपर्यंत १०.३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.शहरात सकाळी कडकडीत ऊन होते. मात्र, दुपारनंतर अचानक पावसाला सुरुवात झाली. काही वेळात रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले. उपनगरांमध्ये अनेक भागात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी केवळ जोरदार वाºयाने नागरिकांची दैना उडवली. शहरासह उपनगरांमध्येही झाडापडीच्या अनेक घटना घडल्या. काही भागात झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने परिसरातील संपूर्ण वीजपुरवठाच खंडित झाला. शिवाजीनगरसह रास्ता पेठ, फातिमानगर, हडपसर, कोंढवा, बाणेर, पाषण, बालेवाडी यांसह विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.शहर व उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पावसाचा जोर कमी-अधिक होता.झाडे पडल्याने वाहतूककोंडीवादळी पावसाने जवळपास ४५ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. हडपसर, औंध, कल्याणीनगर सह शहरातील अनेक भागात झाडपडीच्या जवळपास ४५ घटना घडल्या. फांद्या पडल्याने गाड्यांचे नुकसान झाले. रस्त्यांवर फाद्यांचा खच पडल्याने वाहतूककोंडी झांली होती.पावसामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. हडपसर, फातिमानगर, वाकड, हिंजवडी ब्रिज, वडगाव धायरी, सातारा रस्ता आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे इंजिनमध्ये पाणी जाऊन अनेक वाहने बंद पडल्याने कोंडीमध्ये अधिकच भर पडली. रस्त्याच्या खड्ड्यांमुळेही वाहतूक मंदावली होती. कार्यालयातून घरी परतण्याच्या वेळेसच पावसाने हजेरी लावल्याने नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. अनेकांना घरी पोहोचण्यास दोन तासांचा विलंब लागला.या पावसाने सखल भागात पाण्याची तळी साचली होती. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. सिंहगड रस्त्याचा तर जणू ओढा झाला होता. लगतच्या अनेक दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले. कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकात पाण्याचे तळे साचल्याने वाहने चालविणेही मुश्किल झाले.