शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वादळी सभेने नव्या महापौरांचे स्वागत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2016 04:11 IST

नव्या महापौरांना पदार्पणातच महापालिकेच्या वादळी सभेचा सामना करावा लागणार आहे. उद्या (गुरूवारी) सकाळी ११ वाजता त्यांची निवड होईल व त्यानंतर लगेचच सायंकाळी

पुणे : नव्या महापौरांना पदार्पणातच महापालिकेच्या वादळी सभेचा सामना करावा लागणार आहे. उद्या (गुरूवारी) सकाळी ११ वाजता त्यांची निवड होईल व त्यानंतर लगेचच सायंकाळी ५ वाजता स्मार्ट सिटीसाठीच्या वादग्रस्त एसपीव्ही कंपनीच्या मसुद्याचा विषय असलेली खास सभा होणार आहे.सकाळी ११ वाजता महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशांत जगताप यांची, तर भाजपाने अशोक येनपुरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे मुकारी अलगुडे, तर भाजपाच्या वर्षा तापकीर उमेदवार आहेत. उमेदवारी अर्जमाघारी, त्यानंतर झाले तर मतदान, त्यानंतर विजयी उमेदवारांचा गौरव करणारी भाषणे यांत बराच वेळ जाईल. महापौरांची निवड झाल्यानंतर त्याच पद्धतीने लगेचच उपमहापौरांचीही निवड होईल. या दोन्ही प्रक्रियांमध्येच दुपारचे २ वाजण्याची शक्यता आहे.त्यानंतर लगेचच सायंकाळी ५ वाजता स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही मंजुरीची सभा आहे. एसपीव्हीला काँग्रेस, मनसे, शिवसेना यांचा विरोध; तर भाजपा व सत्ताधारी राष्ट्रवादी यांचा पाठिंबा आहे. त्यामुळेच या विषयावर भाषणे होऊन मतदानही होण्याची चिन्हे आहेत. महापौरपदावर विजयी होणाऱ्या उमेदवाराला ही कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी राजकीय खेळी करून एसपीव्ही विरोधाची चुणूक आजच दाखवून दिली आहे. त्यामुळेच नव्या महापौरांना पहिल्याच सभेत जबाबदारीने काम करावे लागेल. (प्रतिनिधी) महापौरपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता कमी असून, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांची निवड निश्चित आहे. त्यामुळेच ते आज (बुधवारी) मावळते महापौर दत्तात्रय धनकवडे तसेच सभागृहनेते बंडू केमसे यांच्याकडे ‘एसपीव्हीची सभा उद्या नको; नंतर ठेवा,’ अशी विनंती करीत होते. ‘तुम्ही मिरवणूक नंतर काढा; सभा उद्याच होईल,’ असे त्यांना धनकवडे व केमसे यांनी सांगितले.