शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरला वादळी वाऱ्याचा तडाखा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : इंदापूर तालुक्याला गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. यात तालुक्यातील केळीबागांना याचा सर्वाधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इंदापूर : इंदापूर तालुक्याला गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. यात तालुक्यातील केळीबागांना याचा सर्वाधिक फटका बसला. गंगावळण, कळाशी तसेच निमगाव केतकी व इतर परिसरात सर्वाधिक नुकसान झाले. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरूपात भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केली आहे.

इंदापुर, बारामती तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले. सकाळी ११ वाजता जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडाली. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कोरोनामुळे आधीच शेतकरी अडचणीत होते. त्यात शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून केळीचे पीक व उसाचे पीक यंदा जोमात आणले होते. मात्र, वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे केळीच्या बागा लोळल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना मशागतीचा खर्च देखील हातामध्ये पडणार नाही. वाऱ्याच्या झोतामुळे उसाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील मोठ्या प्रमाणात ऊस जागीच झोपले आहेत. या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल असाही आशावाद महारुद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

कोट

आमच्या शेतातील तब्बल अडीच एकर केळी काढणीसाठी आली होती. साधारणपणे आठ ते साडेआठ लाख रुपये या वेळी बागेत मधून उत्पन्न हमखास मिळणार होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर केळी कोसळली आहे. सर्व बाग भुईसपाट झाल्यामुळे हे उत्पन्न मातीमोल झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी यांना शासनाच्या माध्यमातून रोख स्वरूपात भरपाई मिळावी.

-विनोद पाटील, शेतकरी

---

चौकट

निमसाखर येथेही पाऊस

निमसाखर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. सध्या उन्हाच्या झळा दिवसभर लागत असून उन्हामुळे लोक हैराण होत असताना झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

भवानीनगर, सणसरला वादळी पावसाने झोडपले

बारामती : इंदापूर तालुक्याला गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपले. सणसर भवानीनगर भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळाने या भागातील अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे इंदापूर रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र होते.

येथील ग्रामस्थांनी वादळी वाऱ्यासह तुफानी पावसाचा अनुभव घेतला. एक तासाहून अधिक काळ वादळी वारे आणि पावसाचे तांडव सुरू होते. तसेच पावसाने ठिकठिकाणी पाणी साठल्याने परिसराला छोट्या तळ्याचे स्वरूप आले होते. या पावसाने विजेचे खांब जमीनदोस्त झाले. परिणामी वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात आहे.

भवानीनगर लगतच्या शेरपुलावरील भरावावर बाभळीचे झाड पडल्याने येथे एकेरी वाहतूक सुरू आहे. भवानीनगर येथील साखर कारखान्यासमोरील तीन मोठी झाडे पडल्याने वाहतूक थांबली होती. शेवटी पोलिसांनी रस्त्यावर उतरत येथे एकेरी वाहतूक सुरळीत केली आहे.

सायंकाळी पावणेसातच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरु झाला. यावेळी काही काळ गारांचा देखील पाऊस सुरु झाला होता. मात्र,७ च्या सुमारास अचानक वादळी वारे वाहू लागले. यामध्ये सापडलेली वाहने, नागरिक भयभीत झालें. काही ज्येष्ठ नागरिकांना येथील युवकांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे अनर्थ टळला. वादळी वारे सुरु असतानाच पाऊस सुरु झाल्याने रस्त्यावरील नागरिक आणखी धास्तावले. पाऊस कमी होई पर्यन्त अनेक नागरिक मिळेल त्या आडोशाला मुठीत जीव घेऊन थांबले होते. पावणे आठच्या सुमारास पाऊस थांबला. त्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

चौकट

सणसरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालें. या पावसामुळे शेतकऱ्याचे ऊस, मका, कडवळ ही पिके जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे गुरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. केळी सह वांगी, टोमॅटो, मिरची या पिकांचे ही पावसामुळे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी आडसाली उसासाठी सऱ्या काढल्या आहेत. त्या सऱ्यांमध्ये पाणी साठले त्यामुळे या मोकळ्या सऱ्यांमध्ये गवत येऊन त्याचाही खर्च ऊस लागणीच्या अगोदर शेतकऱ्यास सोसावा लागणार आहे. एकंदरितच अचानक आलेल्या आजच्या पावसामुळे कोरोना मुळे अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत जाणार आहे. तालुक्यातील निमसाखर येथे मोठ्या प्रमाणत सुसाट वेगाने वारे वाहिले. परंतू, पाऊस मात्र रिमझिम झाला. सध्या इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊसाला सुरुवात झाली असल्याने काही प्रमाणात पुढिल काळात पाणी टंचाई पासून उसत मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गा मधुन व्यक्त केली जात आहे.

फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील गंगावळण कळाशी भागातील केळी बागा भूईसपाट झाल्या