शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कुमार रिसॉर्टवर तुफान दगडफेक

By admin | Updated: February 19, 2015 02:04 IST

हॉटेल कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर मंगळवारी दुपारी मृतावस्थेत आढळलेल्या सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून करण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे़

लोणावळा : हॉटेल कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर मंगळवारी दुपारी मृतावस्थेत आढळलेल्या सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून करण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे़ या प्रकरणाच्या निषेधार्थ लोणावळ्यात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला़ तसेच निंदनीय प्रकाराचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले आणि आंदोलनकर्त्यांनी हॉटेल कुमार रिसॉर्टवर तूफान दगडफेक केली. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला़ यात आठ पोलीस व सात आंदोलक जखमी झाले.कुमार रिसॉर्टमध्ये रविवारी एका लग्न समारंभाकरिता इंदापूर, रायगड येथील छगन जैन ७ वर्षांच्या मुलीसह आले होते़ लग्नसमारंभादरम्यान रात्री साडेआठनंतर त्यांची मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पण ती न सापडल्याने शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्री सुरुवातीला ‘बेपत्ता’ची तक्रार व नंतर अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला़मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास मुलीचा मृतदेह हॉटेलच्या टेरेसवर सोलर पॅनेलच्या खाली आढळला होता़ पुण्यातील ससून रुग्णालयात केलेल्या शवविच्छेदनाचा अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाला. त्यानुसार मुलीचा मृत्यू बलात्कार करून गळा चिरल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले़ कुमार हॉटेलच्या व्यवस्थापनाने नातेवाइकांना हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पाहू दिले नाही. हॉटेलमध्ये शोधाशोध करू दिली नाही़ याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यासाठी कुमार चौकात जमलेल्या लोकांनी हॉटेलवर तूफान दगडफेक केली. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग देखील एक ते दीड तास रोखण्याता आला़ हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करावा लागला.या प्रकरणातील दोषींना तातडीने अटक करत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या डॉ़ नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्याकडे केली आहे़