शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांबावरील आकड्यांना अटकाव

By admin | Updated: January 7, 2016 01:31 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) तारांवर आकडे टाकून बेकायदापणे वीजजोड घेण्याचे प्रकार शहरातील काही भागांत सर्रासपणे सुरू आहेत

पिंपरी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) तारांवर आकडे टाकून बेकायदापणे वीजजोड घेण्याचे प्रकार शहरातील काही भागांत सर्रासपणे सुरू आहेत. हे रोखण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामुळे वीजचोरीला आळा बसणार असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. दाट वस्तीच्या भागात तारेवर आकडे टाकून वीजचोरी केली जाते. सायंकाळनंतर हे आकडे टाकले जातात. महावितरणचे पथक येताच ते काढून घेतले जातात. यामुळे कारवाई करताना पथकास बंधने येतात. त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. या तारांतून वीजप्रवाह जाणार नाही, अशा एअर बंच कंडक्टर (एबी) इन्सुलेशन केबल जोडण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या तारा काढून त्या ठिकाणी ही एबी केबल जोडण्यात येत आहे. त्या केबलवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नसल्यामुळे अशा चोरीस पूर्णपणे अटकाव होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, अपघात होत असलेल्या ठिकाणी या प्रकारच्या केबल बसविण्यात येत आहेत. विशेष मोहिमेत हे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. शहरभरात या प्रकारे एबी केबल टाकले जाणार आहेत. पिंपरी बाजारपेठेत अशा प्रकारे केबल जोडल्या आहेत. भाटनगर येथील २६ खांब आणि लिंक रोड येथील २२ खांबांवर, त्याचबरोबर मिलिंदनगर भागात अशा प्रकारची केबल जोडली आहे. गांधीनगरातील अनेक खांबांवर अशा प्रकारे केबलजोडणी केली गेली आहे. याचबरोबर शहरातील झोपडपट्ट्या, वस्त्या अशा दाट भागातील वीजवाहक तारांवर केबलजोडणी केली गेली आहे. भोसरीतील महात्मा फुले झोपडपट्टीतील अनेक खांबांवर एबी केबल बसविल्या आहेत. एबी केबलमुळे आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. वीजचोरीच्या माध्यमातून होणारे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान यामुळे टाळण्यास मदत होणार आहे. तसेच, वीजचोरी करताना होणाऱ्या दुर्घटना रोखल्या जातील. वीज चोरून घेण्यापेक्षा थेट मीटरजोड घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत नागरिकांना त्वरित वीज मीटरजोड दिला जात आहे. झोपडपट्टी भागात याप्रमाणे अनेक मीटरजोड दिले गेले आहेत. वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने विशेष तपासणी मोहीम राबवीत आहे. यासाठी स्वतंत्र पथकांची निर्मिती केली गेली आहे. आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कारवाई केली आहे. यामध्ये वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.(प्रतिनिधी)