शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

वाळूउपसा रोखला , कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:14 IST

देऊळगावराजे (ता. दौंड) येथील बंधा-याशेजारी चालणारा अवैध वाळूउपसा अखेर ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी यांनी बंद केला आहे.

देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता. दौंड) येथील बंधा-याशेजारी चालणारा अवैध वाळूउपसा अखेर ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी यांनी बंद केला आहे.गेल्या एका महिन्यापासून देऊळगावराजे येथील बंधा-याशेजारी पाच फायबर आणि पाच यांत्रिक बोटींनी अवैधरीत्या वाळूउपसा चालू होता. या वाळूउपशामुळे बंधा-याला धोका निर्माण झाला होता. याबाबत शेतक-यांनी अनेकदा महसूल विभागातील तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या; परंतु कारवाई मात्र केली जात नव्हती. देऊळगावराजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अनिता बुराडे यांचे पती तुळशीदास बुराडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश आवचर, चेतन औताडे, सचिन आवचर, किरण सूर्यवंशी, योगेश आवचर, संतोष लाव्हार आदी शेतकºयांनी मिळून हा वाळूउपसा बंद केला. महसूल विभागाकडून या वाळूचोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील शेतकºयांनी दिला आहे. या वाळूचोरांकडून दररोज ५० ते ६० ब्रास वाळू येथून भरून नेली जात होती. त्यामुळे गावातील रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते. रोजचा रहदारीचा हा रस्ता असल्याने येथील शेतकºयांना शेतीपंप चालू करण्यासाठी व जनावरांचा चारा आण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागायचा; परंतु या रस्त्यावरून वाळूउपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ये-जा करणेही अवघड झाले होते.बंधाºयाच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाळूच्या ढिगाचा आधार होता आणि तीच वाळू या वाळूचोरांनी उपसायला सुरवात केली असल्यामुळे बंधाºयाला मोठा धोका होऊ शकतो. वेळीच महसूल विभागाने लक्ष दिले, तरच अवैध वाळूउपसा बंद होईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती.