शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: July 25, 2015 05:00 IST

पुरंदर उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण करून बारामतीच्या जिरायती भागात पाणी सोडावे. पशुधन वाचविण्यासाठी चारा डेपो सुरू करावेत

लोणी भापकर : पुरंदर उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण करून बारामतीच्या जिरायती भागात पाणी सोडावे. पशुधन वाचविण्यासाठी चारा डेपो सुरू करावेत. यासह अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील १६ जिरायती गावातील ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. २४) लोणी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. या योजनचे वीजबील टंचाई निवारण निधीतून शासनाने भरावे, ही मागणी केली. रास्तारोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली. बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीच्या दक्षिणेकडील जवळपास २२ गावांतील अर्थकारण केवळ पावसावर अवलंबून आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेतून यातील १६ गावांतील सुमारे २५ हजार एकर क्षेत्र ओलीताखाली येणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच मागील चार वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने ही गावे पाणी, चारा व रोजगारटंचाई झेलत आहेत. बहुतांश कुटुंबांची रोजीरोटी दूध उत्पादनावर अवलंबून आहे. मात्र चाऱ्याअभावी दारातील दुभती जनावरे सांभाळणे जिकिरीचे होऊ लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकजण दुभती जनावरे विकू लागले आहेत. तर या भागातील अनेक गावे व वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.मागील काही काळात या भागातील पाझर तलाव बंधारे, ओढा खोलीकरणाची कामे झाली आहेत. तर पुरंदर योजनचे काम काही भागात पूर्ण झाले आहे. ेत्यातून पाणी सोडून खोलीकरण झालेल्या ठिकाणी पाणी सोडण्याची मागणी येथील ग्रामस्थ सातत्याने करीत आहेत. मात्र, त्याकडे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज लोणीभापकरसह १६ गावांतील ग्रामस्थांनी बारामती-मोरगाव रस्त्यावर लोणी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी पुरंदर उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे व पाणी सोडावे. त्यासाठीचा वीजखर्च टंचाई निवारण निधीतून शासनाने भागवावा. तसेच पशुधन वाचविण्यासाठी जिरायती भागात तातडीने चारा डेपो सुरू करावेत. जिरायती गावांतील प्रत्यक्ष पीक परिस्थिती पाहून आणेवारी मोजावी. पुरंदर योजनेतून वंचित राहिलेल्या भागाचे फेरसर्वेक्षण करावे. त्या भागात योजनेचे पाणी द्यावे. या मागण्यांचे निवेदन या वेळी शासनाला देण्यात आले.या वेळी बारामतीचे नायब तहसीलदार शामराव अडागळे, पुरंदर उपसाचे एम. आर. ननावरे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सतीश शिंदे तसेच १६ गावांतील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)