शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

का-हाटीत ग्रामस्थांचा रास्ता रोको

By admin | Updated: January 5, 2015 00:35 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून काऱ्हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची ७३ एकर जमीन शरद पवार अध्यक्ष

बारामती/काऱ्हाटी : जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून काऱ्हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची ७३ एकर जमीन शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेला हस्तांतरित करण्यात आली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्याचबरोबर जमीन मूळ संस्थेकडेच कायम राहावी, या मागणीसाठी आज बारामती-पुणे राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यामध्ये ग्रामस्थ, विद्यार्थी, विविध पदांवर असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.दरम्यान २२२ आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.अजित पवारांनी ‘कृषी मूल’ संस्थेची जागा बळकावलीमाजी मंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या संस्थेचा विकास होईल, या उद्देशाने त्यांना ‘कृषी मूल’ संस्थेचे अध्यक्ष केले होते. मात्र, त्यांनी फक्त एक इमारत बांधून तेच विश्वस्त असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेकडे मोक्याच्या ठिकाणची ७३ एकर जागा हस्तांतरित केली. त्याच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. मात्र, त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्याच दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जागा हस्तांतरित केली. याला ग्रामस्थांचा विरोध आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी व स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी सर्वांना अंधारात ठेवून हा प्रकार केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आज पुणे-बारामती रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद वाबळे, माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बराटे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीपराव खैरे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कौले, शहराध्यक्ष अ‍ॅड. नितीन भामे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर मासाळ, माजी पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते महादेव खंडाळे, सरपंच सुरेखा खंडाळे, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जमीन हस्तांतरण प्रकरणात महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्याचबरोबर न्यायालयीन लढादेखील उभा राहणार आहे, अशी माहिती महादेव खंडाळे यांनी दिली. शाळेच्या माजी विद्यार्थिनी अश्विनी खैरे यांनी विद्या प्रतिष्ठान संस्थेचा विकास अजित पवार यांनी पाहिला आहे. त्याला सर्व विद्यार्थी नेटाने विरोध करतील, अशी ग्वाही दिली. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, भाजपाचे शहराध्यक्ष नितीन भामे, शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे यांनी पाठिंबा दिला. माजी विद्यार्थी गणेश जाधव यांनी आंदोलन अधिक तीव्र केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.