शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

रेल्वे कुरकुंभ मोरीत रास्ता रोको

By admin | Updated: June 15, 2017 04:46 IST

येथील रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दौंड नगर परिषद, रेल्वे प्रशासन यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : येथील रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दौंड नगर परिषद, रेल्वे प्रशासन यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. मंगळवारी (दि. १३) सायंकाळी शहरात तुफान पाऊस झाला. रेल्वे कुरकुंभ मोरीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. तेव्हा अजनुज (ता. श्रीगोंदा) येथील महादेव मारुती शितोळे या व्यक्तीचा पाय रेल्वेच्या नाल्यात घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले. येथील नेने चाळीतील नाल्यात या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीच्या मृत्यूला नगर परिषद आणि रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीने जोर धरला होता. या घटनेमुळे नगर परिषद आणि रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांत संतापाची लाट होती. दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती. नवीन रेल्वे कुरकुंभ मोरीचे काम झाले पाहिजे. कुरकुंभ मोरीचे काम अडविणाऱ्या राजकीय मंडळींना धडा शिकवला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या आशयाच्या आंदोलक घोषणा देत होते. या वेळी शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे. शिवसेनेचे राजेंद्र खटी, अनिल सोनवणे, संतोष जगताप, आनंद पळसे, गणेश दळवी, आकाश झोजे, कैलास शहा, नामदेव राहिंज, रूपेश बंड, अनिकेत बहिरमल, शैलेश पिल्ले, अजित फुटाणे, श्रीराम ग्रामपुरोहित, विक्रम इंगवले, गणेश पवार उपस्थित होते. रेल्वेच्या नाल्यावर ढापे टाकले जातील, असे आश्वासन मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिल्यावर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी आक्रमकरेल्वे कुरकुंभ मोरीच्या परिसरातील रेल्वेच्या नाल्यात महादेव शितोळे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा नगर परिषद आणि रेल्वे प्रशासन यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पोलीस ठाण्यामध्ये आक्रमक पवित्रा घेतला. या वेळी बादशहा शेख, शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, इंद्रजित जगदाळे, विलास शितोळे, वसीम शेख, रिजवाना पानसरे, संध्या डावखर, ज्योती राऊत, प्रणोती चलवादी, मोहन नारंग, गौतम साळवे, गुरुमुख नारंग, सोहेल खान, विनोद नगरवाल यांनी सांगितले, की ४८ तासांच्या आत चौकशी करून कारवाई करतो. पोलीस म्हणाले, की तातडीने आताच गुन्हा दाखल झाला पाहिजे....आणि काळाने झडप घातली : महादेव शितोळे अजनुज (ता. श्रीगोंदा) येथून पुण्याला निघाले होते. रेल्वे स्टेशन परिसरात ते पोहोचले. परंतु जोराचा पाऊस सुरू झाल्याने त्यांनी पुण्याला जाण्याचे रद्द केले आणि घरी परत येताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.