शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘हक्का’च्या पाण्यासाठी रास्ता रोको- हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:16 IST

इंदापूर तालुक्याला गेली चार वर्षे झाले ‘हक्काचे’ पाणी मिळत नाही.

पळसदेव : इंदापूर तालुक्याला गेली चार वर्षे झाले ‘हक्काचे’ पाणी मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. जर पुणे शहराला तुम्ही १८ टीएमसी पाणी ‘राखीव’ ठेवू शकता तर आमच्या हक्काचे खडकवासला व नीरा डाव्या कालव्याचे पाणी का मिळू शकत नाही. तालुक्यातील लोकप्रतिनिधी अकार्यक्षम आहेत. असा हल्लाबोल करीत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि. २0) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव (ता. इंदापूर) येथे रास्ता रोको आंदोलन केले.काँग्रेस पक्षाच्या वतीने सुमारे दोन तास हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जवळपास चार हजार शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. दोन वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील पाझर तलावांमध्ये पाणी येत नाही. शेतकऱ्यांनी घोषणा देत व हातात फलक घेऊन शासनाचा निषेध केला. ‘पाणी आमच्या हक्काचे; नाही कुणाच्या बापाचे, निष्क्रिय लोकप्रतिनिधीचा धिक्कार असो, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही.’अशा घोषणा देत व नीरा डाव्या कालव्याचे पाणी मिळालेच पाहिजे, नीरा व भीमा नदीवरील सर्व बंधारे भरलेच पाहिजे, खडकवासला कालव्याचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, निष्क्रिय लोकप्रतिनिधीचा निषेध असो, असे फलक घेऊन शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.महामार्गावर चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाटील म्हणाले, चार वर्षांपासून शेतकºयांवर पाण्याबाबत अन्याय होत आहे. आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी अधिकाºयांना भेटतात व आवर्तनातून पाणी सोडल्याचे सांगतात. त्यांना पाण्याचा ‘गेझ’बघण्याचे कसे आठवले? भाटघर सणसर ३६ फाटा ते ५९ फाट्यापर्यंत ७.१९ टीएमसी पाणी मिळणे गरजेचे असून, सणसर कटचे ३.२ टीएमसी पाणी गेले कुठे? अन्याय कराल, तर त्यांची सुटी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पाणी येऊ शकत नसेल तर आमदारांना नैतिक पदावर बसण्याचा अधिकार नाही.या वेळी मुरलीधर निंबाळकर, अ‍ॅड. कृष्णाजी यादव, मयूर पाटील, दीपक जाधव, शिवाजी कन्हेरकर, नीलेश कन्हेरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बनसुडे, दीपक जाधव, संपत बंडगर, रंगनाथ देवकाते, भूषण काळे, आदी उपस्थित होते.>खडकवासला कालव्याचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. के. शेटे व तहसीलदार सोनाली मेटकरी त्यांच्यासमोर बसून चर्चा करू लागले. मात्र आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते. पाटीलही आक्रमक झाले. पुण्याच्या पाण्याबाबत कायदा नाही. मात्र आमच्या हक्काच्या पाण्याबाबत असा कायदा कसा? असा प्रश्न त्यांनी केला. आठ दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.खडकवासला कालव्याचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, पुणे पाटबंधारे विभागाचे व नीरा डावा कालव्याचे अभियंता बी. के. शेटे, इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर उपस्थित होते. पोलीस निरीक्षक मधुकर पवार, सहायक पोलीस निरीक्षक नांगरे, दंगल नियंत्रक पथकाचे जवानांनी बंदोबस्त ठेवला होता. तालुका अध्यक्ष कृष्णाजी यादव, रमेश जाधव, विलास वाघमोडे, अशोक शिंदे, हनुमंत बनसुडे, शरद चितारे, अंकुश पाडुळे यांची भाषणे झाली.