शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंंद्यांच्याविरोधात झारगडवाडीत रास्ता रोको

By admin | Updated: June 20, 2017 07:15 IST

झारगडवाडी (ता. बारामती) येथे अवैध धंद्यामुळे अनेक महिलांचे संसार उध्द्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या महिलांचा आक्रोश थांबविण्यासाठी आता गावकऱ्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कडोर्लेवाडी : झारगडवाडी (ता. बारामती) येथे अवैध धंद्यामुळे अनेक महिलांचे संसार उध्द्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या महिलांचा आक्रोश थांबविण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढाकार व्यक्त केला आहे. अवैध धंद्याच्या विरोधात आंदोलनाचा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.त्यापैकी आज झारगडवाडी येथे आज बारामती सोनगाव- वालचंदनगर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या मध्ये विशेषता: महिलांचा खूप मोठ्या प्रमणावर सहभाग होता.गेल्या अनेक वषार्पासुन गावात अनेक ताडी, दारु, हातभट्टी, मटका धंदा सुरु आहे. त्यात आता वेश्याव्यवसाय ही खुले आम सुरु झाला आहे. या विषयी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रारी देण्यात आल्या. मात्र, तात्पुरत्या जुजबी कारवाई मुळे अवैध धंदे उघडपणे सुरुच होते. शेवटी ग्रामस्थांनी बैठक घेउन सलग सात दिवस आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला. यात रास्ता रोको , पोलीसांना बांगड्यांचा आहेर, मुख्यमंत्र्यांचा मुखवटा घालुन दारु विक्री करणे, तहसिल कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण, अशी अनेक आंदोलने करण्याच्या निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे .त्यापैकी आज केलेल्या रास्तारोको आंदोलनात महिलांचा खूप मोठ्या प्रमणावर सहभाग होता.शिवाय ग्रामस्थ,तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण झारगडवाडी हि आज रस्त्यावर उतरली होती. यावेळी अवैध धंद्याविरोधात संतप्त भावना ग्रामस्थांनी, महिलांनी व्यक्त केल्या. आंदोलनानंतर अवैध धंदे बंद न झाल्यास परिणाम खूप वाईट होतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांच्या घरी जाऊन सर्व ग्रामस्थांनी समज दिली .यावेळी संपूर्ण गावातून मोर्चा काढण्यात आला.मद्यपींची गय केली जाणार नाही, असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला.पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड व पोलीस उपनिरीक्षक छबू बेरड यांनी ग्रामस्थांनां अवैध धंदे आढळल्यास कडक कारवाई करण्याची ग्वाही दिली. या मोर्चा साठी बाहेरील गावामधील पुढारी, नेते, अधिकारी वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित होता