पुणो : खडकवासला प्रकल्पातील पाणी शहर व जिल्ह्यातील शेतीसाठी वाटप करण्याचा निर्णय घेणा:या कालवा समितीची बैठक रखडलेली आहे. ही बैठक झालेली नसतानाही धरणांमधील पाणी मोठय़ा प्रमाणात सिंचनासाठी जात असल्याने शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने कालवा समितीची बैठक तत्काळ घ्यावी, अशी मागणी गुरुवारी पालिकेच्या मुख्य सभेत करण्यात आली. पुढील निर्णय होईर्पयत सिंचनासाठीचे आर्वतन थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पाण्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यासाठी अद्याप पालकमंत्र्यांची नेमणूक न झाल्याने पाटबांधारे व पालिकेची कालवा समितीची बैठक रखडलेली आहे. तर दुसरीकडे, धरणातील पाणी सिंचनासाठी सोडले जात असल्यामुळे या पाण्याचे नियोजन न झाल्यास मार्च 2क्15पासून पुणोकरांना पुन्हा पाणीकपातीचा सामना करावा लागेल. पालकमंत्री नसतील तर राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)
महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कालवा समितीची बैठक तातडीने घेण्याबाबत महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. पाणीकपातीचे संकट ओढावणार असल्याने याबाबत तातडीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.