शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आता अस्थिरता थांबवा; ‘बजेट’चे पाहा!

By admin | Updated: February 8, 2016 02:08 IST

निवडणूक आचारसंहिता, ई- टेंडरिंग, पंचायत राज कमिटी व जिल्हा परिषदेतील पदाधिकारीबदल या कचाट्यात सापडलेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला आता

पुणे : निवडणूक आचारसंहिता, ई- टेंडरिंग, पंचायत राज कमिटी व जिल्हा परिषदेतील पदाधिकारीबदल या कचाट्यात सापडलेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला आता तरी गती मिळणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेने २०१५-१६ चा १७८ कोटी ५० लाखांचा, तर पुरवणी ४५ कोटी ७५ लाखांचे मिळून २२४ कोटी २५ लाखांचे अंदाजपत्रक मांडले खरे; मात्र सुरुवातीपासूनच आलेल्या अडथळ्यांमुळे दहा महिने उलटूनही ३० टक्के खर्चही करता आला नाही. त्यात कारभारी बदलाच्या चर्चेत दोन महिने गेले. त्यामुळे अस्थिर अवस्था झालेल्या जिल्हा परिषदेचे बजेट मात्र अद्याप कागदावरच आहे, असे चित्र आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर ९४ टक्के खर्च झाला होता. आता फेबु्रवारीचा पहिला आठवडा झाला तरी कसाबसा ३० टक्केपर्यंत खर्च झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जिल्हा परिषदेने केलेल्या अर्थसंकल्पातील घोषणा अद्याप कागदावरच आहेत. विधानसभा निवडणुका व त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांच्या आचारसंहिता लागल्या. त्यात पंचायत राज कमिटी आली. त्याची तयारी व नंतर साक्ष देण्यासाठी असे यात चार ते पाच महिने गेले. याचा प्रशासनावर प्रचंड ताण आला. तसेच यापूर्वी शासन निर्णयाप्रमाणे १५ लाखांपर्यंत कामे ग्रामपंचायतीला देता येत होती. आता ३ लाखांपुढील कामे निविदा काढूनच करावी लागत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागावर प्रचंड लोड आला आहे. याचा परिणाम बजेटवर झाला. यातच डिसेंबरपासून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सव्वा वर्षाची मुदत संपल्याची आठवण इच्छुकांनी केली. कामाला कुठे गती मिळते तोच खो मिळाला. तेव्हापासून आज उद्या करीत करीत हे प्रकरण तीन महिने अधूनमधून पुढे येत राहिले. अखेर फेब्रुवारी उजाडला आणि पक्षनेते अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर तीन-चार दिवस राजीनामानाट्य घडले. तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांची जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन २२ ते २३ सदस्यांच्या सह्यांचे निवेदन दिले आणि आता बदल कसा मारक ठरू शकतो, हे निदर्शनास आणले. त्यानंतर दोन दिवस आता बदल होणे नाही, अशी चर्चा सुरू आहे. आता बदलाची अस्थिरता थांबवा आणि कामं करा, अशी स्थिती जिल्ह्यातून उपस्थित होत आहे. तुमचे पक्षनेते जेव्हा निर्णय घेतील तेव्हा घेऊ द्या, पण आता ५० ते ५५ दिवस राहिलेत, अर्थसंकल्प कसा मार्गी लागेल हे पाहा!