शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

‘त्या’ गुळाचे वाटप थांबवा

By admin | Updated: June 17, 2016 05:07 IST

जोपर्र्यंत चौकशी समितीचा अहवाल येत नाही, तोपर्र्यंत त्या गुळाचे अंगणवाडीतील बालकांना वाटप करू नये, असे आदेश गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

पुणे : जोपर्र्यंत चौकशी समितीचा अहवाल येत नाही, तोपर्र्यंत त्या गुळाचे अंगणवाडीतील बालकांना वाटप करू नये, असे आदेश गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील तब्बल साडेचार हजारपेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांना पोषण आहारामध्ये गूळ पावडरचे वाटप करण्यात येते. चक्क हातभट्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या गुळाचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक बाब जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत निदर्र्शनास आणून दिली होती. या वेळी गूळ खाल्ल्यावर एका पदाधिकाऱ्याला करंट लागला.... महिला सदस्यांना तरतरी आली.... तर एका सदस्याने डोक्यात झटका बसल्याच्या प्रतिक्रिया सभेतच सदस्यांनी दिल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी वाटप करण्यात आलेल्या गुळाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नेमण्यात आली आहे. यात एक अन्न व औषध प्रशासन अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व उरुळी कांचनच्या सुपरवायझर यांचा समावेश आहे. हा गूळ दोन महिन्यांपूर्वी एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी वाटप करण्यात आला होता. मेनंतर मुलांना सुट्टी असल्याने पुढील वाटप झाले नव्हते. आता स्थायी समितीत सदस्यांनी हा गूळ निकृष्ट असल्याचा आरोप केल्याने चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत हा गूळ अंगणवाडीतील मुलांना वाटप करू नये, असे आदेश दौलत देसाई यांनी आज महिला व बालकल्याण विभागाला दिले आहेत. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता, गुळाच्या पावडरचे दोन महिन्यांपूर्वी वाटप करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश आम्ही पुढे दिले आहेत, असे सांगितले. (प्रतिनिधी)सर्वसाधारण सभा गाजणारयेत्या शनिवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत असून, या गूळ प्रकरणामुळे गाजण्याची शक्यता आहे. तसेच निवडणुका जवळ आल्याने विरोधक आक्रमक होत असल्याने येत्या सभेत अनेक प्रकरणे बाहेर काढणार असल्याचे काही जणांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आम्ही केलेल्या मागणीनुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली असून, वाटप थांबविले आहे. याचे स्वागत करतो. मात्र, वाटप थांबविण्यापेक्षा अंगणवाडीत गेलेला माल तेथून उचलून परत मागवायला हवा. - दशरथ काळभोर, जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना