शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव मूळ येथे घरांवर दगडफेक

By admin | Updated: June 2, 2017 01:51 IST

कोरेगाव मूळ येथील नागरिकांच्या घरांवर रात्रीअपरात्री गेल्या सात आठ महिन्यांपासून दगडफेक करून दारे खिडक्या बाहेरून

 लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव मूळ : कोरेगाव मूळ येथील नागरिकांच्या घरांवर रात्रीअपरात्री गेल्या सात आठ महिन्यांपासून दगडफेक करून दारे खिडक्या बाहेरून लावल्या जात असल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. याप्रकारची तक्रार कोरेगाव मूळ ग्रामस्थांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात केली होती. हे प्रकार अजूनही सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरेगाव मूळ येथील रहिवाशी आप्पासो कड, सचिन कड, नंदकुमार कड, विलास वाघ, बंडू कड व पांडुरंग कड यांनी केलेल्या तक्रारीनुसार गेल्या काही महिन्यांपासून समाजकंटक व्यक्तीकडून वस्तीतील घरांवर दगडफेक केली जात आहे. रात्री अपरात्री घरांची दारे, खिडक्या वाजविण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे घरातील तसेच वस्तीतील महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती भयभीत आहेत. रात्री बेरात्री दगडफेक होत असल्यामुळे जीव मुठीत घेऊन रात्ररात्र जागत बसावे लागत आहे.याबाबत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. तरीदेखील दगडफेकीचे प्रकार चालूच आहेत. वस्तीतील काही कुटुंबांतील व्यक्तींची हृदय शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांना विश्रांतीची गरज आहे. मात्र रात्री होणाऱ्या या प्रकाराने परिसरातील लोक दडपणाखाली जगत असल्याने परिसरातील लोक दहशतपूर्ण वातावरणात आहेत.