शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दगडी चौथऱ्याची तोडफोड

By admin | Updated: April 4, 2016 01:23 IST

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या पुरातन गडकोटातील मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस असलेल्या दगडी चौथऱ्यावर मेघडंबरी उभारून तेथे

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या पुरातन गडकोटातील मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस असलेल्या दगडी चौथऱ्यावर मेघडंबरी उभारून तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारण्यासाठी चौथऱ्याची तोडफोड सुरू असून, चौथऱ्याच्या दगडाच्या पहिल्याच थराखाली चुनखडी-विटांमध्ये त्याकाळात तयार केलेली पाण्याची टाकी खुली झाली असून, त्यामध्ये पाणी आढळून आले, त्याचबरोबर दगडी मूर्ती व चुनखडीतून तयार केलेली शिवपिंड सापडली आहे.गेल्या चार-पाच वर्षांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींचा पुतळा गडकोटांमधील याच दगडी चौथऱ्यावर उभारण्याचे काम सध्याच्या विश्वस्त मंडळींनी हाती घेतले. त्यासाठी या चौथऱ्याची तोडफोड करण्यात येत होती. पहिलाच थर उखडल्यानंतर असा प्रकार निदर्शनास आल्याने सदर काम थांबविण्यात आले आहे. यामुळे नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू झाली असून, गडकोटांच्या व जेजुरीनगरीच्या विकासाच्या शिल्पकार अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा गडकोट आवारात उभारला जाणे, ही बाब स्वागतार्ह असली, तरी त्यासाठी भक्कम दगडी चौथऱ्याची तोडफोड करणे योग्य आहे काय? आढळून आलेली मूर्ती, शिवपिंड आणि पाण्याची टाकी याचे नेमके महत्त्व काय असावे? व ते याच ठिकाणी ठेवण्यामागचा उद्धेश काय असावा? याला काहीतरी धार्मिक आधार असावा, अशीच चर्चा सर्वत्र आहे. या संदर्भात अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्यासाठी अत्यंत आग्रही असणारे देव संस्थानचे विश्वस्त संदीप घोणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, या ठिकाणी पाण्याची टाकी होती. ती उघडी असल्याने यात्रा व गर्दीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंधरा-वीस वर्षांपूर्वी तत्कालीन विश्वस्त मंडळाने तिच्यावर फरशी बसवून ती बंदिस्त केली होती. यामुळे येथे काही चुकीचे झालेले आहे असे आजिबात नाही. मात्र, याबाबतची संपूर्ण माहिती घेतली जाईल. ब्रांझ धातूपासून तयार केलेली अहिल्यादेवींची मूर्ती या ठिकाणी बसवण्याचा आम्ही सर्व विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला होता. यापूर्वीच्या कोणत्यानी विश्वस्त मंडळाने गडकोटात तोडफोडीचा निर्णय घेतलेला नव्हता, उलट दुरुस्त्याच केलेल्या आहेत. या विश्वस्त मंडळाने मात्र पूर्ण माहिती न घेता ऐतिहासिक वास्तूची रचनाच बदलण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचीच चर्चा अधिक आहे.