शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही ‘खोडकरपणा’, सुशीलकुमार शिंदे यांची ‘साहेबांवर’ मिस्कील टिप्पणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 03:14 IST

राजकारणातले एक गंभीर नेतृत्व म्हणून ‘शरदराव’ परिचित असले, तरी महाविद्यालयीन दिवसातील त्यांचा खोडकर आणि मिस्कीलपणा हा चर्चेचा विषय होता

पुणे : राजकारणातले एक गंभीर नेतृत्व म्हणून ‘शरदराव’ परिचित असले, तरी महाविद्यालयीन दिवसातील त्यांचा खोडकर आणि मिस्कीलपणा हा चर्चेचा विषय होता. त्यांच्याच वर्गातील एक मुलगा एका मुलीवर प्रेम करीत होता. तो तिला पत्र लिहायचा पण ती ते फाडून फेकून द्यायची. एकदा शरदरावांनी त्या मुलीच्या नावाने त्या मुलाला पत्र पाठविले. ‘माझं पण तुझ्यावर प्रेम आहे, पण मी मुद्दाम असे वागते. रविवारी तीनच्या शोला चित्रपटगृहात येते’, असे त्या पत्रात म्हटले होते. तो मुलगा खूश झाला. त्या चित्रपटगृहामध्ये त्याने तिची खूप वाट पाहिली, पण हळूच शरदरावत्याच्या शेजारी जाऊन बसले...मुलगा आला ना एवढा असे शरदरावांनी म्हटल्यावर तो मुलगा ओशाळून उठून गेला.....अजूनही शरदरावांचा ‘खोडकरपणा’ गेलेला नाही... अशा शब्दांत बीएमसीसी महाविद्यालयातील शरदरावांच्या खोडकरपणाचा किस्सा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला आणि साहेबांच्या चेहºयावरही हसू उमटले.जागतिक मराठी अकादमीतर्फे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा सन्मानाचा प्रवास सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी बीएमसीसीच्या वास्तूतच महाविद्यालयीन शिक्षणाचे धडे गिरविलेल्या साहेबांचे मिस्कील व्यक्तिमत्त्व सुशीलकुमारांनी उलगडले... साहेबांनीदेखील इतर अनेक उद्योग करीत असल्याने महाविद्यालयीन वर्ष पूर्ण करण्यास काहीसा विलंब लागल्याची दिलखुलासपणे कबुली दिली.या वेळी शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊनसन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, डॉ. पी. डी. पाटील, विलास रकटे, डॉ. मोहन आगाशे, संदीप वासलेकर आणि बीव्हीजीचे हणमंत गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.या प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, यशवंतराव गडाख, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, संयोजक सचिन ईटकर उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे