शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळाबाबत अद्यापही संभ्रम

By admin | Updated: June 11, 2017 03:57 IST

महापालिका शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येण्याबाबत प्रशासनाच्या निवांतपणामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. असंतुष्टांची वर्णी लावण्यासाठी चांगले व्यासपीठ

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिका शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येण्याबाबत प्रशासनाच्या निवांतपणामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. असंतुष्टांची वर्णी लावण्यासाठी चांगले व्यासपीठ असल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा या विलीनीकरणाला विरोध असून, त्यातून येणाऱ्या दबावामुळेच प्रशासन काही कार्यवाही करीत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. महापालिका शिक्षण मंडळात नगरसेवकांचा समावेश असला, तरी अन्य सदस्यांमध्ये राजकीय असंतुष्टांना स्थान देता येते. महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट बहुमत आहे. १६२ लोकनियुक्त व ५ स्वीकृत अशा १६७ सदस्यांच्या सभागृहात भाजपाचे १०१ सदस्य आहेत. महापालिकेतील सत्तापदे मर्यादित, समित्यांची संख्याही मर्यादित व सदस्यसंख्या मात्र मोठी; त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेकांना सत्तेत सामावून घेता आलेले नाही. त्याशिवाय निवडणुकीत उमेदवारी मागे घ्यायला लावलेले, त्यासाठी काही शब्द दिलेले, पक्षासाठी बरेच श्रम घेतलेले अशांचीही संख्या फार मोठी आहे. त्यांच्याकडून सत्तेत स्थान देण्याबाबत दबाव आहे.यामुळेच शिक्षण मंडळांचे विलीनीकरण न करता त्याचे अस्तित्व कायम ठेवावे, असा एक मतप्रवाह महापालिकेतील सत्ताधारी भाजपात आहे. राज्य सरकारकडून याबाबत आवश्यक ती कार्यवाही करून घ्यावी, असे त्यांचे मत आहे. पक्षश्रेष्ठींकडे त्यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. मंडळ राहिले तर त्यावर काही जणांना नक्की स्थान देता येणार असल्यामुळे पक्षश्रेष्ठीही त्याला अनुकूल असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच प्रशासनाने मंडळाच्या विलीनीकरणाबाबत थंडे धोरण स्वीकारले आहे. खुद्द मंडळातील प्रशासनालाही विलीनीकरण नको आहे. तसे झाले तर त्यांच्या स्वतंत्र कामकाज करण्यावरच मर्यादा येईल.शिक्षण मंडळातील गैरव्यवहार, भ्रष्टाचाराची प्रकरणे यामुळे पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळाचे कामकाज हा कायम चर्चेतील विषय राहिला आहे. शिक्षण मंडळाच्या विलिनीकरणाची घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे पुणे महापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी नव्या सभागृहाला मार्च २०१७मध्ये मंडळाची मुदत संपली असून, आता नव्या रचनेचा प्रस्ताव सभागृहासमोर दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, तशी काहीच हालचाल अद्याप तरी दिसत नाही. - शिक्षण हक्क कायद्यामुळे शिक्षण मंडळाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाली, तरी पुणे महापालिकेसह अन्य काही महापालिकांमधील शिक्षण मंडळे तेथील लोकनियुक्त प्रतिनिधींची पंचवार्षिकची मुदत संपेपर्यंत कायम ठेवावीत, असा निर्णय झाला होता.